एक्स्प्लोर

Nashik News : नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओंनी बनवली अंबाडीची भाजी, जाणून घ्या अंबाडीच्या भाजीचे महत्व 

Nashik News : नाशिक (Nashik) येथील रानभाज्या महोत्सवात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (CEO Leena Bansod) यांनी स्वतः बचत गटाच्या महिलांसोबत आंबाडीची रानभाजी बनवली. 

Nashik News : नाशिक (Nashik) पंचायत समिती (Nashik Panchayat Samiti) आवारात शुक्रवारी आठवडी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या रानभाज्या महोत्सवात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (CEO Leena Bnasod) यांनी स्वतः बचत गटाच्या महिलांसोबत आंबाडीची रानभाजी बनवली. 

गेल्या महिनाभरापासून नाशिकच्या पंचायत समितीत रानभाजी महोत्सव (Ranbhaji Festival) आयोजित केला असून यामध्ये असंख्य बचतगटांनी सहभागी होत स्टोल्स उभारले आहेत. दर शुक्रवारी या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक महिला सहभागी होत रानभाजी महोत्सव आयोजन केले जाते. या रानभाजी महोत्सवात नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सहभाग घेत रानभाजी बनवली आहे. अंबाडीच्या भाजी विशेषतः श्रावण महिन्यात आढळून येत असल्याने तिला विशेष महत्व आहे. 

दरम्यान सीईओ बनसोड यांच्या वैयक्तिक परसबागेत आदिवासी भागात आढळणाऱ्या आंबाडीची भाजीची (Ambadi) रोपं ही लावण्यात आलेली असून यातूनच काही रोपं त्यांनी ही भाजी बनवण्यासाठी आणण्यात आली होती. रानभाज्या महोत्सवात रानभाज्या विक्रीसह बचत गटाच्या महिलांकडून भाज्या बनवल्या देखील जातात,  आंबाडीची भाजी बनवून मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या बचत गटांच्या स्टॉल्सना त्याचबरोबर उपस्थित ज्येष्ठ नागरिक, महिला व जिल्हा परिषदेचे अधिकारी देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी थेट बचत गटाच्या स्टॉलवर जाऊन भाज्या बनवल्यामुळे रानभाजी महोत्सवात हा कुतूहलाचा विषय ठरला.महिला बचत गटांना भाज्या व वस्तूंची विक्री करताना ऑनलाईन पेमेंट ची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढील काळात  बचत गटांच्या महिलांची कार्यशाळा घेण्याच्या सूचना केल्या.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी दीपक चाटे, गट विकास अधिकारी डॉ सारिका बारी, सहायक गट विकास अधिकारी विनोद मेढे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अंबाडीच्या भाजीचे फायदे 
अंबाडी सहसा जंगलात आपल्या आढळून येते. त्यामुळे ती खायला पौष्टीक असते. या भाजीचे फायदे असे कि अंबाडीच्या भाजी अँटी ऑक्सिडंट मोठ्याप्रमाणात असतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होऊन रक्तदाब नियंत्रित होतो. तसेच अंबाडीच्या भाजीमध्ये लो कॅलरीज असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. अंबाडीच्या भाजीत व्हिटॅमिन अ, आयर्न, झिंक मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या समस्यांवर उपायकारक ठरते. त्याचबरोबर केसांच्या वाढीसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी, हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी हि भाजी उपयुक्त ठरते. मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार भाजीचे सेवन करावे. 

अंबाडीची भाजी कशी बनवावी?
सुरवातीला अंबाडीच्या भाजीचे कोवळी पाने आणायची. भाजीला स्वच्छड धुवून बारीक कापून घ्यायची. त्यांनतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ, आवडीनुसार तिखट. पहिल्यांदा कढईत दीड पळी गोड तेल टाकायचे आहे. सर्वात आधी आपण लसुन टाकलेला आहे. लसूण असा व्यवस्थित सोनेरी कलरचा झाल्यानंतर मिरची टाकायची. त्यानंतर कापलेली भाजी टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. पुढील दोन त एटीन मिनिटे भाजी शिजू द्यावी. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget