Baba Amarnath : 'कांद्याला भाव मिळू दे, सरकारला सुबुद्धी येऊ दे...' नाशिकचा कांदा बाबा अमरनाथ यांना अर्पण
Baba Amarnath : नाशिकच्या (Nashik) कांदा उत्पादक शेतकऱ्याने यांनी बाबा अमरनाथला (Baba Amarnath) पाच किलो कांदे प्रसाद म्हणून अर्पण केले.
Nashik Farmer : नाशिकच्या (Nashik) नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे (Sanjay Sathe) यांनी जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध देवस्थान बाबा अमरनाथला (Baba Amarnath) पाच किलो कांदे प्रसाद म्हणून अर्पण केले. देशभरातील कांदा उत्पादक (Onion Farmer) शेतकऱ्यांच्या वतीने योग्य भाव मिळावा, कांदा आयात-निर्यातीचे योग्य धोरण ठरवण्याची सुबुद्धी केंद्र आणि राज्य सरकारला द्यावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.
अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) 01 जुलै पासून सुरु झालेली आहे. यासाठी देशभरातून भाविक बाबा अमरनाथच्या (Baba Amarnath Darshan) दर्शनासाठी जात असतात. नाशिकच्या निफाड (Niphad) तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे हे अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत. एकीकडे राज्यात कांद्याला योग्य भाव नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. याच पार्श्वभूमी,वर कांदा उत्पादक शेतकरी असलेल्या साठे यांनी पाच किलो कांदे अमरनाथ यात्रा करत बाबा बर्फानी गुंफेत नेऊन अर्पण केले. पुजाऱ्यांनी कांद्याचा प्रसाद दानपेटीला स्पर्श करुन परत दिला. त्यानंतर हे प्रसादरुपी कांदे साठे यांनी लष्करी जवानाकडे सुपूर्द केले.
प्रसादरुपी कांदा सैनिकांना दिला
दरम्यान जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध देवस्थान व पवित्र गुहा म्हणून बाबा अमरनाथ तेथील यात्रोत्सव देशात व देशाबाहेर प्रसिद्ध आहे. नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी स्वतःच्या घरातून पाच किलो कांदे (Onion Prasad) घेऊन अमरनाथ यात्रेचा प्रवास सुरु केला. तब्बल सहा दिवसांच्या प्रवासानंतर तो पाच किलो कांदा बाबा अमरनाथ (बाबा बर्फानी) यांना प्रसाद म्हणून अर्पण केला. देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांतर्फे कांद्याला योग्य भाव मिळू दे.. कांदा आयात-निर्यातीचे योग्य धोरण ठरवण्यास केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी दे, अशी प्रार्थना करुन तो कांद्याचा प्रसाद तेथे उपस्थित असलेल्या आणि देशसेवेसाठी रात्र दिवस पहारा करणाऱ्या सैनिकांना दिला.
सुरक्षरक्षकांनी आधी विरोध केला...
साठे म्हणाले की वर्षभरापासून कांद्याला भाव नाही, उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांना भेटत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कांद्यापासून चांगले पैसे व्हावे, कांद्याला योग्य भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारला साकडे या माध्यमातून बाबा अमरनाथ यांना घालण्यात आले. पहेलगाम ते बाबा अमरनाथ गुहेपर्यंत पाऊस व बर्फ, थंडी असा खर्च प्रवास करत ते बाबा अमरनाथला पोहोचले, मात्र या ठिकाणी सुरक्षारक्षकांनी गुहेत कांदे नेण्यास विरोध केला. त्यावेळी साठे यांनी सांगितले की, इतर लोक त्यांच्या श्रद्धेप्रमाणे प्रसाद ठेवतात. त्यानुसार माझी श्रद्धा आहे की, माझ्या शेतात रात्रंदिवस कष्ट करुन पिकवलेले कांदे प्रसाद म्हणून आणले आहेत. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी तपासणी करुन परवानगी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या :