Chhagan Bhujbal : भुजबळ फार्मवर भाजप युवा सेनेकडून सरस्वतीची आरती, छगन भुजबळ मात्र नाशिकबाहेर...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणी नाशिक (Nashik) भाजपने (BJP) भुजबळांविरोधात आंदोलन केले.
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणी नाशिक (Nashik) भाजपने (BJP) भुजबळांविरोधात आंदोलन केले. यावेळी सरस्वतीचे पूजन करत आंदोलकांनी छगन भुजबळांवर ताशेरे ओढले.
छगन भुजबळांच्या सरस्वती देवीच्या (Sarasvati devi) वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिकमध्ये भाजप आक्रमक झाली असून भुजबळ फार्मच्या प्रवेश द्वारावरच युवामोर्चाच्या वतीने आज दुपारी अनोखं आंदोलन छेडण्यात आलं. स्थानिक युवासेनेचे पदाधिकारी सरस्वती देवीची प्रतिमा घेऊन छगन भुजबळांना भेट देण्यासाठी आले असता छगन भुजबळ फार्मवर उपस्थित नसल्याने फार्मच्या प्रवेशद्वारावरच पदाधिकाऱ्यांकडून देवीची आरती करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी मुंबई (Mumbai) येथील एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी सरस्वतीच्या (Saraswati) फोटो संदर्भात वक्तव्य केले होते. यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी या वक्तव्यांवर टीका करत भुजबळांचे कान टोचले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहे. या कार्यक्रमप्रसंगी भुजबळ यांनी वरील वक्तव्य केले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांनी याबाबत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान भुजबळांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातुन निषेध व्यक्त करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर आज भाजप युवा सेनेच्या वतीने छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्मवर जाऊन अनोखे आंदोलन केले. विशेष म्हणजे आंदोलक हे भुजबळांना सरस्वतीची प्रतिमा भेट देण्यासाठी गेले होते. मात्र भुजबळ घरी नसल्याने आंदोलकांनी भुजबळ फार्मवरच सरस्वतीची पूजा करत आरती केली.
काय आहे भुजबळांचे आक्षेपार्ह वक्तव्य ?
'शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. त्यांची पूजा कशासाठी करायची?, असे वादग्रस्त वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे. महापुरुषांमुळे तुम्हा आम्हाला शिक्षण मिळाल, सगळं मिळालं यांची पूजा करायला हवी..यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे', असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं.
भुजबळांच्या फार्महाऊसवर बंदोबस्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता छगन भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर भुजबळांनी केलेल्या या विधानावरून वातावरण तापल्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नाशिक पोलिसांकडून खबरदारी देखील घेतली जात आहे. छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत.