एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : 'हे महाराष्ट्राचे सरकार आहे की दिल्लीश्वरांचे सरकार', आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला 

Nashik Aditya Thackeray : सर्व आमदारांना केवळ तुला मंत्री करतो, तुला मंत्री करणार एवढेच सांगितले जात आहे. असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. 

Nashik Aditya Thackeray : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, या सरकारमध्ये सर्व आमदारांना केवळ गाजर दिले आहे, तुला मंत्री करतो, तुला मंत्री करणारच असं  सांगितलं जात आहे. हे महाराष्ट्राचे सरकार आहे की दिल्लीश्वरांचे सरकार हेच कळत नाही, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांनी शिंदे गटाला लगावला आहे. 

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा (shivsamvad Yatra) सातवा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे चार दिवसांची ही शिव संवाद यात्रा असणारे नाशिक (Nashik) औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांमधून ही शिवसंवाद यात्रा जाणार आहे. या आधी देखील आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा काढत राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पक्ष बांधणी केली होती. आता शिवसंवाद’ यात्रेचा दुसरा टप्पात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) मतदारसंघातील मुंढेगाव येथून संवाद कार्यक्रमास सुरुवात झाली, यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले कि, शिवसंवाद दौऱ्यातही अनेक ग्रामपंचायतींना भेटणार आहे. या माध्यमातून लोकांच्या समस्या जवळून अनुभवयाला मिळतात. गद्दार गँगने सरकार पाडल्यानंतर गावागावात जाऊन लोकांशी बोलत आहे. 50 लोक असले तरी मी बोलणार असून तिकडे 50 कोटीचा खर्च झाला पण त्यांच्याकडे 50 लोक येत नाही. हे सरकार जास्त दिवस टिकत नाही. एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेने ही वेळ आली आहे. गद्दारच सरकार होर्डिंग्जवाल्यांची कर्ज मुक्ती करत आहे, बाकी कुणाची नाही. हे सरकार इकडेतिकडे फिरत आहे, मात्र लोकांना काही मिळत नाही.  अशी अनेक गावं आहे, जिथे रस्ते नाही डोल्या मधून दळणवळण नाही. आजूबाजूला समृध्दी आली, पण गावात पाणी नाही. मुंबई महापालिकेसाठी पाण्यासाठी आम्ही इथे धरण बांधले. पण आज याच लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. 

ते पुढे म्हणाले, या मुंढेगावात काही दिवसांपूर्वी भीषण आगीची घटना घडली. काय काय नुकसान झालं, यावर लवकरच भेट देऊन तपासणी करण्यात येईल, त्यानंतर अहवाल तयार करण्यात येईल. त्याचबरोबर हा प्रश्न देखील सभागृहात उपस्थित केला जाईल. दुसरीकडे मुख्यमंत्री दिल्ली जात आहेत, मात्र लोकांसाठी काही मागत नाही, फक्त स्वतःसाठी जात आहेत. हे सरकार अल्पकाळासाठीअसून लवकरच पडणार आहे, लिहून ठेवा, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. दोन गट झाले, वैगरे नाही, जे गेले ते गद्दार आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्र आमचा समजत होतो. त्याच वेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. दावोसला गेल्यानंतर चाळीस कोटींचा खर्च करण्यात आला. मात्र त्याचा 4 कोटींचा फायदा नाही. हे मंत्री मंडळ पडणार असून याचा विस्तार पण होणार नाही. फक्त गाजर देऊन ठेवत आहे. शिवाय एक महिला या मंत्रिमंडळात नाही. या गद्दारानी सरकार पाडल, पण आम्ही फिरणार, मात्र माझ्याकडे द्यायला खोके नाही, फक्त शब्द आहे, तो मी देतो. 

मंत्रिमंडळात एकही महिला नाही.... 

चांगला प्रतिसाद मिळत आहेत. लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सध्याची परिस्थिती बघितली तर एका माणसाच्या राजकीय महत्त्वकांक्षासाठी महाराष्ट्र मागे चालला आहे. सत्ताधाऱ्यांसाठी राजकीय परिस्थिती चांगली नसल्यामुळे निवडणुका घेत नाही. अनेकदा लोक भेटतात आणि सांगतात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंसारखा नेताच महाराष्ट्राला मिळाला नाही. राज्यात अनेक नवे उद्योग आणले, त्यामध्ये 80 रोजगार स्थानिक तरुणांना द्यावा लागणारी असे आपले सरकार असताना नियम केला. यासह राज्याचे मंत्रिमंडळात एकही महिला नाही. हे सरकार कोसळणारच आहे. हे महाराष्ट्राचे सरकार आहे की दिल्लीश्वरांचे सरकार आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदेUnion Budget 2025 : Superfast : अर्थ बजेटचा ; अर्थसंकल्पातून कुणाला काय काय मिळालं? 01 February 2025CM Devendra Fadnavis On Union Budget :  मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, आर्थिक इतिहासातला मैलाचा दगडUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : नव्या करप्रणालीत मोठे बदल, बजेटबाबात सोप्या भाषेत विश्लेषण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
Guillain Barre Syndrome : जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
Embed widget