Nashik News : नाशिकच्या लेकीची उत्तुंग भरारी! 14 व्या वर्षीच मिळवली दोन विद्यापीठाची डॉक्टरेट
Nashik News : नाशिकच्या (Nashik) अवघ्या 14 वर्षाच्या कन्येने कोलंबिया (Colombia) आणि घाना (Ghana) विद्यापीठाकडून डॉक्टरेट प्राप्त केली आहे.
Nashik News : नाशिकच्या (Nashik) अवघ्या 14 वर्षाच्या कन्येने कोलंबिया (Colombia) आणि घाना (Ghana) विद्यापीठाकडून डॉक्टरेट प्राप्त केली आहे. गीत पराग पटणी (Geet Parag Patni) असे या चिमुकलीचे नाव असून गीतने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी वेगवेगळ्या सात विद्यापीठांना (University) तिचे संशोधन प्रबंध (Research Project) सादर केले होते. त्यापैकी कोलंबिया आणि घाना या विद्यापीठाची डॉक्टर पदवी मिळून तिने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. एवढ्या कमी वयात एकाच वेळी दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे डॉक्टरेट मिळवणारी गीत देशात पहिलीच मुलगी ठरल्याचा दावा वरील डॉक्टर पराग पटणी यांनी केला आहे.
मागील दोन वर्ष देशासह जगभरात कोरोनाने (Corona) धुमाकूळ घातला. नाशिकमध्ये देखील दोन वर्ष भयावह परिस्थितीला सर्वांनीच तोंड दिले. या दोन वर्षांच्या कालखंडात अनेकांचे रोजगार गेले, अनेकांनी नवे व्यवसाय उभारले. काहींनी वेगवगेळ्या कामात स्वतःला गुंतवून घेतले. नाशिकच्या गीतने अशाच एका विषयाला वाचा फोडत संशोधनाच्या माध्यमातून जगासमोर मांडले. या काळात जेष्ठांसह लहान मुलं मुली घरीच असल्याने मोबाईलची सवय लागल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर नाशिक येथील गीतने मुलांच्या वाढत्या मोबाईल सवयीमुळे कसे दुष्परिणाम झाले? त्यावर योग्य अभ्यासातून कसे उपाय करता येतील यावर शोध निबंध लिहले.
अवघ्या चौदा वर्षांच्या असलेल्या गीतने हे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील सात विद्यापिठांना सादर केले. यातील दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून गीतला या शोधनिबंधासाठी डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. त्यामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोलंबिया आणि घाणा या दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची डॉक्टरेट एकदाच मिळवणारी गीत देशातील कमी वयात हा बहुमान मिळविणारी ती देशातील पहिली मुलगी असल्याचा दावा गीतचे वडील पराग पटणी यांनी केला आहे. कारण एकाच वेळी दोन डॉक्टरेट इतक्या कमी वयात कोणालाही मिळालेल्या नाहीत.
नाशिक शहरातील नामांकित निर्मला कॉन्व्हेन्ट शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या गीतला लहानपणापासून योगाची खूप आवड आहे. गीतची आईवडील हे डॉक्टर असल्याने लहानपणापासून योगाची आवड निर्माण झाली. त्यातूनच तिने पुढे योगाचे क्लास देखील घेण्यास सुरवात केली. दरम्यान कोरोना काळात योगाचे क्लास सुरु असताना तिच्या अस लक्षात आले की सध्या ऑनलाईन शाळा सुरू आहेत. त्यामुळे मुल मोबाईल आणि इतर गॅझेटसचा अधिक वापर करत आहेत आणि यामुळे त्यांच्या आरोग्यावर मानसिकतेवर देखील परिणाम होत आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी गीतने ' कोरोना काळात लहान मुलांकडून मोबाईलसह इतर गॅझेटचा वापर आणि त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम व योग अभ्यासातून त्यावर उपाय' विषयावर प्रबंध तयार करून जगभरातील सात नामांकित विद्यापीठांना सादर केला होता आणि त्यातून कोलंबिया आणि घाणा या दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी गीतला डॉक्टरेट दिली आहे.
योगातून सर्व काही साध्य
गीतने आतापर्यंत अनेकाना योगाचे धडे दिले आहेत. आपल शरीर जर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर प्रत्येकाने योगा करणे खूप गरजेचे आहे आणि याच योगाच्या आधारावर गीतने डॉक्टरेट मिळवून सर्वांचं लक्ष वेधल आहे. गीतला योगातील सर्व बारकावे माहित आहेत. तिने प्रबंध सादर करताना अतिशय मेहनत घेतली. या काळात तिच्या आई वडिलांनी देखील तिला मदत केली. वाटल नव्हत की मला आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची डॉक्टरेट या वयात मिळेल पण ते शक्य झाले आहे. हे बघून खूप आनंद वाटतोय अशी प्रतिक्रिया गीत पटणी यांनी दिली आहे.
या विषयांत डॉक्टरेट
कोरोनाच्या महाभयंकर संकटात सर्व क्षेत्र प्रभावी झालेल्या असताना लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कोरोनाच्या भयावय परिस्थितीचा सामना करावा लागला होता. या काळात अनेकांनी चांगल्या सवय जडल्या तर काहींनी वाईटही सवय जडल्या. यात प्रामुख्याने लहान मुलांना मोबाईल सारख्या वेगवेगळ्या गॅझेटचे व्यसनही जडले. त्याचे मोठ्या प्रमाणात विपरीत होते. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गीतने कोरोना काळात लहान मुलांकडून 'मोबाईलसह इतर गॅझेट चा वापर आणि त्याचा त्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम व योग अभ्यासातून त्यावर उपाय' विषयावर प्रबंध तयार करून जगभरातील सात नामांकित विद्यापीठांना सादर केला होता.