Nashik Election Reservation 2022 :नाशिक मनपा आरक्षण सोडतीत महिलांचा डंका, पहा कोणत्या प्रभागात महिला 'राज'
Nashik Election Reservation 2022 : नाशिक महापालिकेसाठी (Nashik Mahapalika) आरक्षण सोडत जाहीर (Election Reservation) झाली असून महत्वाच्या प्रभागात महिलांचा डंका पाहायला मिळाला आहे.
Nashik Election Reservation 2022 : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून महत्वाच्या प्रभागात महिलांचा डंका पाहायला मिळाला आहे. त्यामुळे हि निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान नाशिक मनपाच्या 133 जागांपैकी 67 जागा महिलांच्या ताब्यात जाणार असून, 43 प्रभागांत प्रत्येकी एक आणि एका प्रभागात दोन याप्रमाणे 45 महिलांचे आरक्षण असेल, तर उर्वरित 22 जागांच्या आरक्षणाची सोडत चिठ्ठ्या टाकून काढण्यात आली. तसेच एकूण 133 जागांपैकी प्रत्येक प्रभागांमध्ये अ ब क असे गट पडले आहेत. तर 44 या प्रभागामध्ये दोन पुरुष आणि दोन महिला आरक्षण आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 19 जागा राखीव तर अनुसूचित जमातीसाठी दहा जागा राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी 19 पैकी दहा जागा महिलांसाठी राखीव तर अनुसूचित जमातीसाठी सहापैकी पाच जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित 52 सर्वसाधारण महिला राखीव आहे
अनुसूचित जाती महिला आरक्षण
अनुसूचित जमाती महिलांसाठी एकूण पाच जागा असून 7 ब अनुसूचित जमाती 11 ब अनुसूचीत जमाती थेट आरक्षित राखीव असतील. तर 02 अ, 04 अ, 34 ब या जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
अनुसूचित जमाती महिला आरक्षण
अनुसूचित जमाती महिलांसाठी एकूण पाच जागा असून 7 ब अनुसूचित जमाती 11 ब अनुसूचीत जमाती थेट आरक्षित राखीव असतील. तर 02 अ, 04 अ, 34 ब या जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
सर्वसाधारण महिला आरक्षण
नाशिक मनपा निवडणुकीमध्ये सर्वसाधारण महिलांच्या 12 जागेसाठी सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये 5 ब, 10 ब, 16 ब, 18 ब, 21 ब, 30 ब, 31 ब , 32 ब, 33 ब, 36 ब, 37 ब या प्रभागांत सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
अशी पार पडली प्रक्रिया
सुरुवातीला मनपा आयुक्त रमेश पवार यांनी आरक्षण सोडत कशी राबवली जाणार? याची माहिती दिली. तर उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी आरक्षण सोडत कशी काढली जाणार? याबाबत सविस्तर विवेचन केले. सुरुवातीला अनुसूचित जाती महिला राखीव गटासाठी चिठ्ठी सोडतीसाठी टाकण्यात आल्यानंतर महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते एक एक चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले.
राजकीय नेत्यांची पाठ
नाशिक महानगरपालिकेच्या आरक्षण सोडत प्रक्रिया आज पार पडली. हि सोडत प्रक्रिया सर्व नाशिकरांना दिसावी यासाठी युट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. तर अनेक नाशिककारासंह महिला वर्ग, युवा कार्यकर्ते, काही राजकीय नेते उपस्थित होते. मात्र नाशिक शहरातील महत्वाच्या राजकीय नेत्यांची उपस्थिती अत्यल्प दिसून आल्याचे पाहायला मिळाले.