Nashik Crime : नाशिककरांनो, दामदुप्पट अमिषाला बळी पडू नका; नऊ जणांची 91 लाखांची फसवणूक
Nashik Crime : दामदुप्पट पैसे मिळण्याच्या अमिषाला बळी पडून अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येत आहेत.
![Nashik Crime : नाशिककरांनो, दामदुप्पट अमिषाला बळी पडू नका; नऊ जणांची 91 लाखांची फसवणूक maharashtra news nashik crime news Fraud of lakhs with the lure of double amount in nashik Nashik Crime : नाशिककरांनो, दामदुप्पट अमिषाला बळी पडू नका; नऊ जणांची 91 लाखांची फसवणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/15/066356de5aa228b47c358fe77fede4231689423122332738_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Crime : गेल्या काही दिवसांत दामदुप्पट पैसे मिळण्याच्या अमिषाला (Fraud) बळी पडून अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिक शहरातील अनेक नागरिकांची देखील अशा माध्यमातून फसवणूक झाली आहे. अशातच एकाच दिवसात नाशिकमधील नऊ जणांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यातून जवळपास 91 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
सहा महिन्यात दामदुप्पट नफा (Double Profit) मिळवून देण्याचे आमिष दाखवून आठ जणांची सुमारे 55 लाख 25 हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी रवी बारकू गवळी आणि रुची रवी गवळी यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात (Indiaranagar Police) आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव देवरे यांचा शेती व्यवसाय आहे. 2019 मध्ये व्यवसाय निमित्त रवी बारकू गवळी यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर 2020 मध्ये पुन्हा देवरे व गवळी भेटले. त्यावेळी गवळी यांनी आर. आर. वर्ल्ड फायनान्शिअल सव्हिसेस कंपनीत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या रकमेत सहा महिन्यात दाम दुप्पट परतावा मिळवून देण्याचे तसेच शेअर मार्केटमध्ये (Shear Market) गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून विविध योजनांची माहिती दिली.
त्यानंतर 2 जुलै 2020 मध्ये ठरल्याप्रमाणे वीस लाख रुपये गुंतवणूक आरटीजीएसद्वारे गवळी यांच्या बँक खात्यात जमा केली. त्यावर हमी म्हणून पंधरा लाखाचे दोन धनादेश गवळी यांनी दिले. 10 सप्टेंबर 2020 मध्ये मित्रांसमवेत गवळी यांच्या मुंबई येथील कार्यालयात गेले. त्या ठिकाणी त्यांची पत्नी रुची रवी गवळी, निखिल सांगळे, नीलेश खेडकर उपस्थित होते. रुची गवळी यांनी दोन दिवसात खात्यावर 15 लाखांची रक्कम जमा करून देण्याचे सांगत हमी म्हणून दिलेले धनादेशही मागून घेतले. मात्र दोन दिवसांनी पैसे जमा झाले नाही. त्यानंतर वारंवार फोन करूनही गवळी यांनी पैसे न दिल्याने देवरे यांची 20 लाख रुपयांसह मंजूषा आहिरे 5 लाख, हर्षदा पाटील 10 लाख, प्रीतेश दुमणे 1 लाख, प्रशांत शिंदे 3 लाख, दीपाली शिंदे 5 लाख, मित्तल भदाणे 75 हजार, प्रतिभा देवरे 2 लाख 50 हजार असे यांचे एकूण 35 लाख 25 हजार रुपये आणि फिर्यादी वैभव देवरे यांचे 20 लाख अशी एकूण 25 लाख 25 रुपयांची फसवणूक केली.
ट्रेडिंगच्या माध्यमातून फसवणूक
तसेच दुसऱ्या घटनेत ट्रेंडिंगमधून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नाशिक शहरात उघडकीस आली आहे. कॉमिक्स व फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये कंपनीत पैसे गुंतवून नफा मिळवून देण्याचे दाखवून नाशिक शहरातील एका महिलेची 36 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सागर संगम बेहरा यांच्या विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime : समोसे ऑनलाईन ऑर्डर करणं डॉक्टरला पडलं महागात: 1.40 लाख रुपयांची फसवणूक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)