एक्स्प्लोर

Nashik Ganeshotsav : आला रे आला, गणपती आला! नाशिकमध्ये बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत!

Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये (Nashik) ढोलताशांचा गजर, टाळ्यांचा नाद आणि मोरया... मोरयाच्या (Ganpati Bappa Morya) गजरात आज सकाळपासूनच श्री गणेशाचे आगमन होत आहे.

Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये (Nashik) ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, टाळ्यांचा नाद आणि मोरया... मोरयाच्या (Ganpati Bappa Morya) गजरात आज सकाळपासूनच उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आगमन होत असून शहरात बाप्पाच्या आगमनासाठी मोठा उत्साह असून सर्वत्र ढोल ताशांसह बाप्पाचं आगमन होत आहे. त्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाविकांना प्रतीक्षा असलेला लाडक्या गणरायाचे आज घरोघरी वाजत गाजत आगमन होत असून या चैतन्यपर्वा मुळे भाविकांमध्ये उत्साहात शिगेला पोहोचला आहे.

मागील दोन वर्ष कोरोना काळ असल्याने गणपती बाप्पाचं आगमन झालं, मात्र फारसा उत्साh नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे मळभ दूर झाल्याने भाविकांनी  जोरदार उत्साहात धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. दरम्यान आठवडाभरापासूनच गणेश मूर्ती सजावट व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत होती तर काल सायंकाळी तर शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठ फुलून गेल्या होत्या. दरम्यान आज सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी गणेश मूर्तीची खरेदी करत गणेशाचे घरोघरी आगमन तसेच मंडळांचे आगमन होत आहे. 

दरम्यान घरोघरी आपापल्या पसंतीनुसार विविध आकाराच्या बाप्पांना वाजत गाजत आणले जात असून दुर्वा, फुले, धूप, दीप, पंचारती अशी साग्रसंगीत तयारी पूजेसाठी करण्यात येत आहे. पूजा साहित्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. तर आजही खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये नाशिककरांनी गर्दी केली आहे. घरोघरीच्या बाप्पांच्या स्वागताबरोबरच शहरातील ऑफिसेस, दुकाने आदी ठिकाणीही गणपतीची स्थापना करुन प्रत्येकजण  आपापल्या परीने बाप्पांचे जोरदार स्वागत करीत आहे. 

तसेच दोन वर्ष नाशिकककारांसह शहरातील सार्वजनिक मंडळांचे गणपती स्थापना झालेली नव्हती. मात्र यंदा धुमधडाक्यात बाप्पांचे आगमन झाले असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून गणेश मंडळांचीही सकाळपासूनच धावपळ सुरू आहे. ढोलताशे, बँडपथक, ध्वजपथक, सनई-चौघड्याच्या निनादात रथामध्ये किंवा पालखीमध्ये बसवून गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेण्यात येत आहेत. 

गणेश प्रतिष्ठापनेचा मुहूर्त 
बुधवारी ब्रह्म मुहूर्त पासून म्हणजे पहाटे चार वाजून 11 मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून 23 मिनिटांपर्यंत घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करता येणार आहे त्यापैकी लाभ मुहूर्त सकाळी साडेसहा ते सकाळी आठ या वेळेत आहे. सकाळी आठ ते नऊ या वेळेत अमृत मुहूर्त तर सकाळी 11 ते दुपारी साडेबारा या वेळेत शुभमुहूर्त आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजाअर्चा करून गणरायाची स्थापना करण्यात येत आहे. त्यानंतर लाडक्या बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक करण्यामध्ये घरातील महिलामंडळ व्यग्र झाले असून काही महिलांनी दुकानांमधून मोदक विकत घेण्यास पसंती दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठे बदल, सोनं उच्चांकी पातळीवर, 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सोनं महागलं, चांदीच्या दरात घसरण, 1 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय घडलं? कोणत्या विषयावर झाली चर्चा? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय घडलं? कोणत्या विषयावर झाली चर्चा? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Prakash Ambedkar on AAP : दिल्लीत आम आदमी पक्षाचा धुरळा, केजरीवालही पराभूत; प्रकाश आंबेडकरांनी एक इमोजीसह फक्त 10 शब्दात दोन कारणे सांगितली!
दिल्लीत आम आदमी पक्षाचा धुरळा, केजरीवालही पराभूत; प्रकाश आंबेडकरांनी एक इमोजीसह फक्त 10 शब्दात दोन कारणे सांगितली!
Amit Thackeray : आता भाजपला घराणेशाही दिसत नाही का? अमित ठाकरे आमदार होण्याचे संकेत मिळताच काँग्रेसचा सवाल
आता भाजपला घराणेशाही दिसत नाही का? अमित ठाकरे आमदार होण्याचे संकेत मिळताच काँग्रेसचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रियाDevgad Hapus In Sangli : सांगलीच्या फळ मार्केटमध्ये देवगड हापूस आंबा दाखलRaju Shetti On Supreme Court : न्यायाधीशांनी 3 टप्प्यांत पगार घ्यावा,FRPच्या मुद्यावरुन आक्रमकABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 10 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठे बदल, सोनं उच्चांकी पातळीवर, 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सोनं महागलं, चांदीच्या दरात घसरण, 1 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय घडलं? कोणत्या विषयावर झाली चर्चा? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय घडलं? कोणत्या विषयावर झाली चर्चा? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Prakash Ambedkar on AAP : दिल्लीत आम आदमी पक्षाचा धुरळा, केजरीवालही पराभूत; प्रकाश आंबेडकरांनी एक इमोजीसह फक्त 10 शब्दात दोन कारणे सांगितली!
दिल्लीत आम आदमी पक्षाचा धुरळा, केजरीवालही पराभूत; प्रकाश आंबेडकरांनी एक इमोजीसह फक्त 10 शब्दात दोन कारणे सांगितली!
Amit Thackeray : आता भाजपला घराणेशाही दिसत नाही का? अमित ठाकरे आमदार होण्याचे संकेत मिळताच काँग्रेसचा सवाल
आता भाजपला घराणेशाही दिसत नाही का? अमित ठाकरे आमदार होण्याचे संकेत मिळताच काँग्रेसचा सवाल
Tirupati Balaji Laddu Controversy : तिरुपती लाडू वाद, आधी जनावरांच्या चरबीमुळे प्रकरण तापलं, आता CBI च्या तपासात नवी माहिती समोर!
तिरुपती लाडू वाद, आधी जनावरांच्या चरबीमुळे प्रकरण तापलं, आता CBI च्या तपासात नवी माहिती समोर!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणमधील पीएम किसान, शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिलांना 1500 की  500 रुपये मिळणार काय होणार? GR काय सांगतो?
पीएम किसान, शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिला शेतकरी अपात्र ठरणार की त्यांना 1500 रुपये मिळणार? GR काय सांगतो?
"आई-वडिलांना शारीरिक संबंधावेळी बघणार का...", रणवीर अलाहाबादियाच्या फालतू प्रश्नावर नेटकरी भडकले
Mahayuti clash: महायुतीत पुन्हा धुसफूस, शिंदेंच्या मंत्र्यांच्या फाईल्स CMO मध्ये अडकल्या, आदेश न निघाल्याने तीव्र नाराजी
आधी एकनाथ शिंदेंना समितीतून वगळलं, आता शिंदेंच्या मंत्र्यांच्या फाईल्स CMO मध्ये अडकल्या, महायुतीत धुसफूस
Embed widget