एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकमध्ये तरुणाचे केले अपहरण, मारहाण करत लुटले, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील आडगाव (Adgaon) जवळ दोन तरुणाचे अपहरण केल्यानंतर त्यास मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. 

Nashik News : नाशिक (Nashik) शहर परिसरात चोरी, लुटमारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आज तर चोरांनी (Theft) कहरच केला. दोन तरुणाचे अपहरण केल्यानंतर त्यास मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. 

नाशिकच्या आडगाव (Adgaon) परिसरात ही घटना घडली आहे. मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास जयपाल गिरासे व ओंकार राऊत हे दोघे मित्र मोटार सायकल वरून जात असतांना त्यांना अज्ञात इसमांनी अडविले. त्यानंतर जवळील लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांचे कारमध्ये टाकून अपहरण केले.

दरम्यान अपहरण केल्यानंतर पुन्हा दोघांना मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याची चैन बळजबरीने काढुन घेतलेे. यानंतर संबंधित दोघा युवकांना टाकून देत संशयितांनी पळ काढला. याबाबत आडगांव पोलिसांत (Adgaon Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या गुन्ह्याच्या तपासासाठी पथक तयार करण्यात आले. त्यानुसार तपास सुरू असताना संशयित दत्ता सारंग कुटे, निरंजन उर्फ पप्पु घेवर शेळके, आकाश राधाकिसन काळे यांना शिताफीने नाशिक, पंचवटी, औरंगाबाद रोड, साधुग्राम जुन्या बस स्थानकासमोर त्यांच्या ताब्यातील अल्टो कारसह ताब्यात घेण्यात आले. 

दरम्यान संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केली असता सोमनाथ कारभारी सानप,  प्रशांत सखाराम आहेर, निलु उर्फ निलेश कदम, सोमनाथ सानप याचा मित्र यांच्यासह केला आहे. संशयितांच्या ताब्यातून गुन्हयात वापरलेली एर्टिगा जप्त करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे संशयितांना ताब्यात घेवुन त्यांना पुढील तपासाकामी आडगांव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नाशिकमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट 
नाशिक (Nashik) शहरात गेल्या काही दिवसांपासुन गुन्हेगारीने (crime) चांगलंच डोकं वर काढलय. प्राणघातक हल्ले, चोऱ्या, घरफोडी असे प्रकार हे रोजचेच झाले असतांनाच आता जबरी लुटीचेही प्रकार समोर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. नाशिकच्या मध्यवर्ती सीबीएस (CBS Bus Area) परिसरात दोनच दिवसांपूर्वी 27 किलो चांदीच्या लुटीची घटना घडली होती, त्यातील आरोपीही अजून फरार आहे आणि हा प्रकार ताजा असतांनाच नागासाधूच्या रूपातील चोरांनी आता पोलिसांना आव्हान दिल. त्यानंतर म्हणजेच 27 ऑगस्टला देखील चोरांची टोळी पकडण्यात आल्याने खळबळ उडाली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा बसणार तरी कधी ? हाच प्रश्न आता उपस्थित होतो आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेतNCP Muslim Candidate : 10 टक्के जागांवर राष्ट्र्वादी मुस्लिम उमेदवार देणारRamdas Athawale Vidhansabha : 10 ते 12 जागांसह 2 मंत्रिपदाची रामदास आठवलेंची मागणीManish Sisodia Ahmednagar : मनीष सिसोदियांच्या हस्ते कर्जतमधील शाळेचं उद्घाटन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Embed widget