(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Accident : नाशिकमध्ये घराच्या बाल्कनीत खेळत होती चिमुरडी, तोल गेला अन होत्याच नव्हतं झालं!
Nashik Accident : नाशिकच्या (Nashik) सिडको परिसरात इमारतीच्या बाल्कनीत (Balcony Accident) खेळत असलेल्या चिमुरडीचा अचानक तोल गेला अन होत्याच नव्हत झालं.
नाशिकमध्ये घराच्या बाल्कनीत खेळत होती चिमुरडी, तोल गेला अन होत्याच नव्हतं झालं!
Nashik Accident : पालकांच्या हलगर्जीपणा मुळे अनेक बालकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना काही नवीन नाही. अशीच एक घटना नाशिक (Nashik) शहरातील सिडको परिसरात घडली आहे. नाशिकच्या सिडको परिसरात इमारतीच्या बाल्कनीत (Balcony Accident) खेळत असलेल्या चिमुरडीचा अचानक तोल गेला अन होत्याच नव्हत झालं. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक सिडको परिसरात बाल्कनीतून पडल्याने एका 18 महिन्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. समृद्धी राहुल खैरनार असे या बालिकेचे नाव आहे. सिडको परिसरात (Cidco Area) खैरनार कुटुंब वास्तव्यास आहे. येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर त्यांचे घर आहे.
दरम्यान दुपारच्या सुमारास समृद्धी घरात खेळता खेळता बाल्कनीत गेली. यावेळी सर्वजण कामात व्यस्त असल्याने कुणाचंही समृद्धीकडे लक्ष गेले नाही. याच दरम्यान समृद्धी बाल्कनीच्या रेलिंग वर चढली. अन यातच तिचा तोल गेला.
समृद्धीचा तोल जाऊन पडल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ खाजगी रुग्णाला दाखल केले. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुलांना सांभाळा!
सध्या दैनंदिन अतिशय व्यस्त झाले आहे. यामुळे कुटुंबियांना वेळ देणे देखील दुरापास्त झाले आहे. अशातच लहान मुलांच्या संदर्भात अनेक घटना समोर आल्या आहेत. कुटुंबियांचे लक्ष नसताना लहान मुलांसोबत विपरीत घटना घडल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे लहान मुलांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे या घटनांवरून लक्षात घेणे गरजेचे आहे.