Nashik Malegaon : मालेगावकरांनो, सेल्फीसाठी स्टंटबाजी ठरेल जीवघेणी, पुलावरून पाण्यात उड्या; स्टंटबाजांवर कारवाई
Nashik Malegoan : मालेगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारून स्टंटबाजांवर तात्काळ कारवाई करायला सुरुवात केली आहे.
![Nashik Malegaon : मालेगावकरांनो, सेल्फीसाठी स्टंटबाजी ठरेल जीवघेणी, पुलावरून पाण्यात उड्या; स्टंटबाजांवर कारवाई maharashtra nashik news Youth of Malegaon perform stunts in Girna river, action by Malegaon police Nashik Malegaon : मालेगावकरांनो, सेल्फीसाठी स्टंटबाजी ठरेल जीवघेणी, पुलावरून पाण्यात उड्या; स्टंटबाजांवर कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/06/b52e284c860d93343e5a0ef9d717313b1691305694181738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Malegaon : बातमी आहे 'एबीपी' माझाच्या (ABP Majha) इम्पॅक्टची. नाशिकच्या मालेगावातील (Malegaon) गिरणा नदी पात्रातील केटिवेअर बंधाऱ्याच्या पुलावरून पाण्यात उड्या मारणाऱ्या स्टंटबाजांची बातमी एबीपी माझावर दाखवताच, मालेगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारून स्टंटबाजांवर तात्काळ कारवाई करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी गिरणा नदी पात्रावर असलेल्या पुलावर जाऊन स्टंटबाजांना अक्षरशः पिटाळून लावत स्टंटबाजी करणाऱ्यांना सज्जड दम देखील भरला.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) काही भागांत जोरदार पाऊस झाल्याने गिरणा नदीला (Girna River) खूप पाणी आले आहे. ही नदी मालेगाव शहरातून जात असल्याने सुटीच्या दिवशी गिरणा नदीच्या केटीवर बंधाऱ्याच्या भिंतीवर अनेक तरुण आणि लहान मुले मोठ्या संख्येने जमतात. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ टाकण्यासाठी तरुणांकडून (Stunt) अनेक जीवघेणे प्रकार केले जातात. हा प्रकार सध्या मालेगावमधील गिरणा नदीच्या केटीवर बंधाऱ्यावर होताना दिसून आला. अनेकांकडून भिंतीवर उभे राहून सेल्फी काढला जातो तर काही पाण्यात उड्या मारून जीवघेणी स्टंटबाजीही करतात. अनेकवेळा मुलांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे पाहायला मिळते. तरुणांनो जीव धोक्यात टाकू नका, वेळीच सुधरा आणि जीवघेणी स्टंटबाजी करू नका, असे आवाहन मालेगाव अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय पवार यांनी केले.
दरम्यान, एबीपी माझाच्या बातमीनंतर मालेगाव पोलिसांनी (Malegaon Police) संबंधितांवर कारवाई करण्या सुरवात केली आहे. गिरणा केटिवेअर पुलावरून वाहत्या पाण्यात उड्या घेत स्टंटबाजी (Social Media) सुरू होती. अखेर पोलिसांनी या स्टंटबाजांविरूद्ध कारवाई सुरु केली असून पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. गिरणा पुल परिसरात परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पोलिसांकडून कारवाईसह आवाहन
दरम्यान गिरणा नदीला पाणी आल्याने केटीवेअर पुलावरून उड्या मारण्याचा प्रकार काही दिवसांपासून सर्रासपणे सुरु आहे. ही स्टंटबाजी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी मोठी प्रमाणात उसळत असते. अरुंद भितींवर होणाऱ्या गर्दीमुळे अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्यावर्षी अशाच पद्धतीने स्टंट करताना एका युवकाला प्राण गमवावे लागले होते. हा प्रकार थांबविण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले आहे. मात्र, त्याला न जुमानता असे जीवघेणे स्टंट सुरूच आहेत. तरुणांनी स्टंट करू नयेत व पालकांनीही आपल्या लहान मुलांना नदीवर जाण्यापासून रोखावे, त्यामुळे मुले सुरक्षित राहतील असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Malegaon : Girna नदीच्या पाण्यात उडया मारून तरुणांची स्टंटबाजी, मालेगावच्या स्टंटबाजांना रोखणार कोण?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)