Malegaon : Girna नदीच्या पाण्यात उडया मारून तरुणांची स्टंटबाजी, मालेगावच्या स्टंटबाजांना रोखणार कोण?
Malegaon : Girna नदीच्या पाण्यात उडया मारून तरुणांची स्टंटबाजी, मालेगावच्या स्टंटबाजांना रोखणार कोण?
गिरणा नदीला सध्या पूर आल्याने नदी दुधडी भरून वाहत आहे..नाशिकच्या मालेगाव शहरातून जाणाऱ्या या नदीच्या पूर पाण्यात गिरणा पुलावरून उड्या घेत काही तरुण जीवघेणी ' स्टंटबाजी ' करत आहेत. १५ ते २० फूट उंच असलेल्या या पुलावरून उड्या घेतांनाचे हे दृश्य सध्या व्हायरल होत आहे. मालेगाव शहरातून वाहणाऱ्या गिरणा नदीच्या उगमावर समाधानकारक पाऊस झाल्याने सध्या गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे..या नदीमध्ये तरुणांचे पूरपाण्यात उडी घेण्याचे धाडस जीवावर बेतण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्साही तरुण स्टंटबाजी करीत असल्याने प्रशासनाची पुरती डोकेदुखी वाढली असून पुराच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन व आपात्कालीन यंत्रणेकडून खबरदारी घेण्याचा सूचना दिल्या जात आहे.























