एक्स्प्लोर

Nashik News : अवैध सावकारीचा बळी, 24 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, आईचा हंबरडा 

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील देवळा (Deola) तालुक्यात 24 वर्षीय तरुण अवैध सावकारीचा बळी ठरला आहे.

Nashik News : अलीकडच्या काळात युवकांमध्ये ताणतणाव आणि नैराश्यासारख्या कारणांमुळे आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर अवैध सावकारीचा (Illegal moneylenders) फास आता हल्लीच्या तरुणांमध्ये आवळला जात असल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे मानसिक तणावातून अनेकजण टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वीच नाशिक (Nashik) शहरात अवैध सावकारीमुळे अनेकांचा बळी गेल्याचे समोर आले होते. अशातच नाशिक जिल्ह्यातील देवळा (Deola) तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. उसनवारीचे पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने 24 वर्षीय युवकाने गळफास घेत स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षल संजय गायकवाड असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांनी (Deola Police) संशयित दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकास अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात संशयितांचा शोध सुरू आहे. मात्र या घटनेने सावकारीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे अधोरेखित झाले आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय हरी गायकवाड यांनी संशयित प्रवीण सदाशिव आहेर व अमोल निकम यांच्याकडून 21  लाख रुपये उसने घेतले होते. त्याबदल्यात हर्षल गायकवाडने या दोघांना तीन चेक दिले होते. मात्र खात्यावर पैसे नसल्याने हे चेक बाउंस झाले. यामुळे या दोघांनी फिर्यादीचा मुलगा हर्षल संजय गायकवाड यास प्रत्यक्ष भेटून तसेच मोबाईलवर वारंवार धमकी देत पैशांचा तगादा लावला. या त्रासाला कंटाळून हर्षल याने शनिवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

संजय गायकवाड यांना हर्षल हा एकुलता एक मुलगा होता. अत्यंत हुशार असलेल्या हर्षलच्या निधनाने देवळा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा प्रवीण आहेर या संशयित आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी भेट दिली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे करीत आहेत. 

नाशिकमध्ये खासगी सावकारीचा फास 

नाशिक शहरात सध्या अवैध सावकारीला ऊत आला आहे. सावकारी जाचाला कंटाळून मागील काही दिवसांपूर्वी चौघांनी आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले होते. नाशिकमध्ये सध्या सावकारांचा त्रास वाढलेला असतानाच कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या आर्थिक अडचणीचा फायदा अवैध सावकारांनी उचलल्याचे समोर आले आहे. नागरिकांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ येत असल्याचे चित्र आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget