(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Padvidhar Election : सत्यजित तांबे - शुभांगी पाटील यांच्यात सरळ लढत, नाशिक पदवीधरमध्ये 16 उमेदवार रिंगणात
Nashik Padvidhar Election : आजच्या माघारीनंतर नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत तांबे-पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे.
Nashik Padvidhar Election : नाशिक (Nashik Padvidhar Election) पदवीधर निवडणुकीचा आज माघारीच्या दिवशी सहा उमेदवारांनी माघारी घेतली असून नाशिक पदवीधर निवडणुकीचे चित्र काही अंशी स्पष्ट झाले आहे. तर फडणवीसांच्या भेटीला गेलेले धनराज विसपुते यांनी शेवटच्या काही मिनिटात माघार घेत असल्याचे जाहीर केले. तर आता नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात आहेत.
नाशिक (Nashik) पदवीधर निवडणूक लागल्यापासून क्षणक्षणाला मोठी घडामोड पाहायला मिळाली. अर्ज भरण्याच्या दिवसापासून ते अर्ज माघारीच्या शेवटच्या मिनिटापर्यंत रंगत दिसून आली. दरम्यान आज माघारीच्या दिवशी सहा उमेदवारांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे. यामध्ये मालेगावचे राजेंद्र दौलत निकम, अहमदनगरचे अमोल बाबासाहेब खाडे, पनवेलचे सुधीर सुरेश तांबे, अहमदनगरचे धनंजय कृष्णा जाधव, पनवेलचे धनराज देविदास विसपुते, देवळा नाशिकचे दादासाहेब हिरामण पवार यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर निवडणुकीत आता 16 उमेदवार रिंगणात नशीब अजमावणार आहेत. मात्र सत्यजित तांबे, शुभांगी पाटील, ऍड. सुभाष जंगले यांच्यात खरी लढत होण्याची शक्यता आहे.
राज्यात बहुचर्चित झालेल्या पदवीधर संघाच्या निवडणूक अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे विरोधात ठाकरे गटाचा पाठिंबा मिळवणारे शुभांगी पाटील यांचे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अद्यापही या निवडणुकीत अनेक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपला मात्र शुभांगी पाटील यांचे मन वळविण्यात अपयश आल्याचेही या माध्यमातून समोर येत आहे. भाजपच्या इच्छुक व ठाकरे गटाच्या पाठिंबा मिळवणाऱ्या शुभांगी पाटील यांचे मन वळवण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजपचे तारणहार गिरीश महाजन हे कालपासून नाशिकला तळ ठोकून होते मात्र पाटील या संपर्कात नाही. आता त्यांनी आपला मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता.
तांबे विरोधात पाटील अशी लढत?
काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी असतानाही तत्कालीन आमदार सुधीर तांबे यांनी कुटुंबाच्या आग्रहाचे कारण पुढे करून भाजपच्या संपर्कात असलेल्या पुत्र सत्यजित तांबे यांचा अपक्ष काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र काँग्रेस पक्षाने पक्षभंगाची कारवाई केल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात आले. भाजपने देखील ऐनवेळी पर्यंत इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांना वेटिंगवर ठेवत अधिकृत उमेदवारी जाहीर केली नाही. त्यांनी देखील अपक्ष फॉर्म रिंगणात उतरल्या. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. दरम्यान आज माघारीच्या शेवटच्या दिवशी 22 पैकी सहा उमेदवारांनी माघार घेतली. तीन वाजेपर्यंत अखेरच्या वेळी काहीतरी नाट्यमय घडामोडी घडतील निवडणूक एकतर्फी होईल, अशी शक्यता असताना मात्र आता तांबे विरोधात पाटील अशी लढत नाशिक पदवीधर मतदारसंघात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हे उमेदवार रिंगणात
रतन कचरु बनसोडे, नाशिक वंचित बहुजन आघाडी, सुरेश भिमराव पवार, नाशिक नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी, अनिल शांताराम तेजा, अपक्ष, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर,धुळे अपक्ष, अविनाश महादू माळी, नंदूरबार अपक्ष, इरफान मो असहाक, मालेगाव जि.नाशिक अपक्ष, ईश्वर उखा पाटील, धुळे अपक्ष, बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक,अपक्ष, ॲड. जुबेर नासिर शेख,धुळे अपक्ष, ॲड.सुभाष राजाराम जंगले, श्रीरामपुर, अपक्ष, सत्यजित सुधीर तांबे, संगमनेर, अपक्ष, नितीन नारायण सरोदे, नाशिक अपक्ष, पोपट सिताराम बनकर, अहमदनगर, अपक्ष, शुभांगी भास्कर पाटील, धुळे अपक्ष, सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर, अपक्ष, संजय एकनाथ माळी,जळगाव,अपक्ष असे एकूण 16 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत.