![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिककर काळजी घ्या! व्हायरल इन्फेक्शनने डोक्याला 'ताप', क्लिनिक, दवाखाने फुल्ल
Nashik News : गेल्या काही दिवसांपासून सर्दी, ताप खोकल्याने नाशिककर बेजार झाले आहेत.
![Nashik News : नाशिककर काळजी घ्या! व्हायरल इन्फेक्शनने डोक्याला 'ताप', क्लिनिक, दवाखाने फुल्ल maharashtra nashik news patients with cold viral infection in Nashik city Maharashtra Nashik News : नाशिककर काळजी घ्या! व्हायरल इन्फेक्शनने डोक्याला 'ताप', क्लिनिक, दवाखाने फुल्ल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/07/83afa06e9b8f3702c4d4fdd970bdc6531678193051001441_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात सर्दी, ताप खोकल्याने (Viral Infection) नाशिककर बेजार झाले आहेत. क्लिनिक, दवाखाने फुल्ल झाले असून 'व्हायरल इन्फेक्शन' शहरवासीयांसाठी तापदायक ठरत असल्याचे चित्र आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता वेळीच डॉक्टरांचा (Doctars) सल्ला घ्यावा. मास्कसह सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत नाशिक (Nashik) शहरात हवामान बदलते (Climate Change) असून ढगाळ हवामानासह पाऊसही पडतो आहे. शिवाय उन्हाचा कडाका देखील वाढला असल्याने नागरिकांमध्ये ताप-खोकल्याचा प्रसार होत आहे. अशातच गेल्या पंधरा दिवसांपासून खासगी आणि शासकीय रुग्णालयात सर्दी खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. सध्या, राज्यासह देशभरात ऑडिनो आणि एच1 एन2 या व्हायरसची (H1N2 Virus) लक्षणे बहुतांश रुग्णांत आढळत असून अशा प्रत्येकाने मास्कचा वापर करावा असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून किरकोळ सर्दी-ताप-खोकला आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. क्लिनिक, रुग्णालये दवाखाने सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांनी भरले आहेत. त्यातच वातावरणात सातत्याने ऊन, थंडी, पाऊस असे बदल होत असल्याने या तक्रारीत अधिक भर पडली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून विचित्र 'व्हायरल इन्फेक्शन'चा सामना सर्वच वयोगटातील नागरिकांना करावा लागत आहे. अन्य व्हायरल आजारांत खोकला चार-पाच दिवसांत कमी होतो. परंतु, आठ ते दहा दिवस उपचार घेऊनही खोकला-ताप कमी होत नसल्याचा अनुभव रुग्णांना येत आहे.
लहान मुलांमध्ये साथीचा प्रसार..
मागील काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये देखील साथीचा प्रसार होत असल्याने पालकांचीही चिंता वाढली आहे. दोन आठवडे खोकला न थांबणे, आठवडाभर ताप कमी न होणे, पोटात दुखणे, जुलाब होणे, चक्कर येणे, प्रचंड अशक्तपणा जाणवणे यांसारख्या तक्रारी घेऊन दवाखान्यांत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अँटिबायोटिक्स देऊनही अनेक रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे.
अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या....
दरम्यान अशा रुग्णांमध्ये तापात झटका येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, जेवण कमी होणे, खोकताना दम लागणे, शौचास काळी होणे, शौचाचा वास अत्यंत उग्र असणे, चक्कर येऊन पडणे अशी लक्षणे रुग्णांमध्ये आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. लांबत जाणाऱ्या अशा तीव्र लक्षणांमुळे काही रुग्णांची प्रकृती खालावत असून, त्यांना रुग्णालयांतही दाखल करावे लागत आहे. तसेच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत. विषाणूने शरीरात प्रवेश करू नये यासाठी नाक- तोंडाला स्पर्श करणे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. अधिक पाणी पिण्यास प्राधान्य द्यावे. आरोग्यातील बदलांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. ताजी फळे, घरचा ताजा व हलका आहार घ्यावा. घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)