Nashik Citylink : नाशिककर! आजपासून सिटीलिंक बसचा प्रवास महागला... असा असणार नवा तिकीटदर
Nashik Citylink : नाशिककर! आजपासून सिटीलिंक बसचा प्रवास महागला... असा असणार नवा तिकीटदर
Nashik Citylink : नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलींकच्या (Citylink) शहर आणि सेवेची नवीन भाडेवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. यामुळे नाशिककरांना यापुढे अधिकचे तिकीट दर मोजावे लागणार असून शहरी भागांत दोन ते पाच रुपये तर ग्रामीण भागांसाठी सुमारे दहा रुपयांची भाडेवाढ झाली आहे.
आजपासून नाशिककरांचा (Nashik) प्रवास महागला असून नाशिक महानगरपालिकेनं (Nashik NMC) सुरू केलेली सिटीलिंक बससेवा गेल्या काही दिवसांपासून तोट्यात धावते आहे. हाच तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ करण्याचा निर्णय झाला. सरासरी सात टक्क्यांची दरवाढ होत असून प्रवाशांना दोन ते दहा रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या दिशेला कात्री लागणार आहे. त्यामुळे कायमच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असलेली सिटी लिंक बस सेवा आता आर्थिक भुर्दंड देणारी बससेवा ठरते आहे.
नाशिककरांच्या खिशाला आजपासून झळ बसणार आहे. आजपासून सिटीलिंक बससेवेची (Bus Service) दरवाढ लागू करण्यात आली आहे. जसा जसा तोटा वाढू लागला तसे महामंडळाने हात काढून घेतले असून आता नाशिक महानगरपालिकेवर बस चालवण्याच्या पर्याय येऊन ठेपला आहे. जेव्हा दुसरा पर्याय नव्हता. मागच्या भाजपाच्या सरकारमध्ये नाशिकमध्ये बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानुसार आता ही बस सेवा सुरू झाली आहे. बस सेवेला नाशिककरांनी प्रतिसाद देखील चांगला दिलेला आहे. परंतु सुरुवातीपासूनच कामगारांना पगार मिळत नाही. जे चालक वाहत आहेत. त्यांचे आंदोलन देखील झाले आहे. आता नाशिककरांवर बस सेवेची दरवाढ ही लादण्यात आलेली आहे.
साधारणतः 5 टक्के दरवाढ होते, मात्र यंदात 11 टक्क्यापर्यंत ही बस दरवाढ झालेली आहे. त्यामुळे सरासरी हा आकडा येतोय 7 टक्क्यापर्यंतचा आला आहे. निमाणी स्थानकावरून पाथर्डी, सातपूर, नाशिकरोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुटणाऱ्या बसेस आहेत. त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी दोन ते तीन रुपये हे प्रवाशांना अधिकचे द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या मासिक पासच्या दरामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहेत. काही ठिकाणी नाशिकी शहरातून ग्रामीण भागामध्ये म्हणजे नाशिक शहरापासून साधारणतः 20 ते 25 किलोमीटर अंतरावर देखील सिटी लिंक बससेवा धावत असते. या मार्गावरही दरवाढीचा परिणाम जाणवणार आहे. सात ते आठ रुपयांपर्यंतची दरवाढ ही प्रत्येक प्रवाशाला त्याच्या टप्प्यानुसार मोजावी लागणार आहे. सुरुवातीचे दोन किलोमीटरच्या अंतराला कुठल्याही स्वरूपाची दरवाढ नाही, मात्र तिथून पुढे दरवाढ ही लागू झाली आहे.
असा असणार नवा तिकीटदर...
महामंडळाच्या नियमानुसार, दरवर्षी साधारणपणे पाच टक्के भाडेवाढ करता येते. परंतु महामंडळाला होणारा तोटा आणि धनवान इंधन दरवाढ लक्षात घेता महामंडळाने पाच ऐवजी सात टक्के तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेत त्यास मंजुरी देऊन तो प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला होता. पाच टक्क्याने ऐवजी अतिरिक्त 2 टक्के वाढ असल्याने हा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीने जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी दीड महिन्यांपूर्वी सादर केला होता. नव्या भाडेवाडीमुळे शहरी भागांत साधारणपणे दोन ते पाच रुपये आणि ग्रामीण भागांत म्हणजे सिन्नर, गिरणारे, दिंडोरी, त्र्यंबक ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी सुमारे दहा रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.