एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik Chhagan Bhujbal : दादा कोंडके अन् मी शिवसनेच्या अनेक शाखा वाढवल्या, छगन भुजबळ रमले आठवणींत

Nashik Chhagan Bhujbal : शिवसेनेत उभी करताना दादा कोंडके आणि छगन भुजबळ यांनी सोबत काम केल्याचे भुजबळ सांगतात.

Nashik Chhagan Bhujbal : मुंबईत (Mumbai) स्थायिक झालेले अनेक कार्यकर्ते नगरसेवक, आमदार झाले. कोकणात (Kokan) जाऊन बिजारोपन केले. मी असेल, दादा कोंडके असेल यांनी शिवसेनेच्या अनेक शाखा वाढवल्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले. 

छगन भुजबळ हे आज नाशिकमध्ये (Nashik) होते. यावेळी त्यांनी आज होत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या (Udhhav Thackeray) सभेच्या निमित्ताने कोकण आणि शिवसेनेतील नात्यासंदर्भात अनेक आठवणी सांगितल्या. यावेळी भुजबळ म्हणाले कि, आदित्यच्या सभेलाही लोकं गर्दी करत असून उद्धव यांच्या सभेलाही गर्दी होणार हे निश्चित आहे. शिवसेना मुळात उभी राहिली ती म्हणजे कोकणातले माणस मुंबईत काम करतात, त्यांच्यामुळे मुंबईत स्थायिक झालेले अनेक कार्यकर्ते नगरसेवक, आमदार झाले. कोकणात जाऊन बिजारोपन केले. मी असेल, दादा कोंडके (Dada Kondake) असेल यांनी अनेक शाखा शिवसेनेच्या वाढवल्याचे भुजबळ म्हणाले. 

तसेच शिवसेना (shivsena) आजही जशीच्या तशी आहे. एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde)आमदार जरी गेले असले तरी मात्र मतदार हालत नाही. मूळ कार्यकते हालत नाही. चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळते आहे. कसबा पण निसटला. जे लोक कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही ते आजही महाविकास आघाडीसोबत असल्याचे भुजबळ म्हणाले. महाविकास आघाडीचे नेते वेगवेगळ्या ठिकाणी जे रेव्हेन्यू विभाग आहे. म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर ईथे एकत्रित सभा घेऊन नंतर जिल्ह्यात घेणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले. तसेच संजय राऊत यांच्या पत्रावर म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांना कामाला लावायचं आणि अटका अटकी करायची, खऱ्या खोट्या बातमी देऊन बदनामी करायची, अशी सध्या परिस्थिती आहे. आम्ही अनुभव घेतला, ममता बॅनर्जी, केजरीवाल पण घेत आहेत, अनेक ठिकाणी विरोधी पक्ष ते अनुभवत असल्याचे हुजबल म्हणाले. 

तसेच वीजदरावर भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये काही कारखान्याचे रॉ मटेरियलच वीज आहे. शिलापूरला इलेक्ट्रॉनिक लॅब 500 कोटी खर्च करून होणार होती. नाशिकमध्ये पण लॅब झाली नाही. दिल्लीतूनही काही झाले नाही. कारखाने बाहेर जात आहेत. विकेंद्रीकरण करून कारखाने परत कसे येतील, ते बघावे. तर काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामनात यांनी सांगितले की, महिंद्राचा प्रकल्प पुण्यात शिफ्ट होत आहार. यावर भुजबळ म्हणाले की, इलेक्ट्रिक प्रकल्प गेला, त्यात नक्की काय अडचण आहे ते बघा सांगितल्यावर उदय सामंत बोलले की प्रयत्न करतो म्हणून, असेही ते म्हणाले.

अनेक नेत्यांवर टीकास्र 

काही मंत्री कसे वागतायत, बोलतायत त्यांचा परफॉर्मन्स काय आहे, ते लोकं बघत आहेत, असा खोचक टोला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता भुजबळांनी लगावला. मुख्यमंत्र्यांवर बोलताना ते म्हणाले की, रोज आम्ही विरोधी पक्षनेते हाऊसमध्ये बोलतोय, बंद पाडतो आहे हाऊस. ते म्हणतायत सर्वसामान्याचे सरकार पण कृतीतून ते दिसायला पाहिजे. भाजप जन आशीर्वाद यात्रा तुमच्या यात्रेत शेतकरी काय म्हणतायत तेसुद्धा ऐकावे म्हणजे कळेल. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले की, असे प्रकार होऊ नये आणि मुद्दामून रोज रोज लोकांना डीवचण्याचे काम होऊ नये. दोन्ही गोष्टीत संयम पाळायला पाहिजे आणि पोलिसांनी आपले काम व्यवस्थित करावे. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. यावर भुजबळ म्हणाले की, शरद पवार आणि विखे पाटील यांच्यात जमीन आसामानाचे अंतर, टिका योग्य पद्धतीने करावी, कोणावर करतोय त्याचे भान ठेवावे, असा सल्ला छगन भुजबळ यांनी यावेळी दिला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSpecial Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Embed widget