एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik ACB : नाशिकमध्ये एसीबीची मोठी कारवाई, मनपा शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात, धनगरांकडे सापडणार किती 'धन'? 

Nashik ACB : नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच घेताना अटक केली आहे.

Nashik ACB : नाशिकमधून (Nashik) एसीबीची सर्वात कारवाई समोर येत असून नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच घेताना अटक केली आहे. तब्बल पन्नास हजारांची लाच स्वीकारताना एसबीकडून (ACB) कारवाई करण्यात आली आहे. सुनीता धनगर यांच्यासह एका मनपा कर्मचाऱ्यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे. 

नाशिक शहरात लाचखोरीच्या (Bribe) घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. रोजच घडणाऱ्या घटनांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडत आहेत. अशातच आज एसीबीच्या पथकाकडून महत्वाची करावाई करण्यात आली आहे. लाचखोर मनपा शिक्षणाधिकाऱ्यासह मनपा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. यातील तक्रारदार हे एका शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना सदरील संस्थेने बडतर्फ केले आहे. त्याकामी त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरण नाशिक येथे दाद मागितल्याने त्यांच्यावरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली होती. तरी देखील सदरील संस्था यातील तक्रारदार यांना सेवेमध्ये दाखल करून घेत नव्हती. 

दरम्यान तक्रारदार यांनी मनपा शिक्षणाधिकारी (NMC education Officer) सुनीता धनगर (Sunita dhangar) यांच्याकडे सदरील संस्थेवर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. त्याकरिता यातील सुनीता धनगर यांनी सदरबाबत पत्र देण्यासाठी 50 हजार रुपयाची लाच मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाकडून पडताळणी करण्यात येऊन सापळा रचण्यात आला. यावेळी सुनीता धनगर यांना पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर मनपा कर्मचारी असलेल्या नितीन जोशी यांनी सदर पत्र बनवण्याचे मोबदल्यात पाच हजार रुपयाची लाच मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारली. 

एसीबीकडून झाडाझडती सुरु 

सद्यस्थितीत मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि मनपा कर्मचारी नितीन जोशी यांच्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे पोलिसांनी अधिक तपास करण्यास सुरवात केली असून घर इतर मालमत्तेची झाडाझडती घेण्याचे काम सुरु असून यात मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 तसेच हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे. 

नाशिकमध्ये लाचखोरीचा कळस 

दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात रोजच एसीबीकडून धडक मोहीम सुरु आहे. रोज कुठे ना कुठे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. मात्र तरीदेखील इतर सरकारी अधिकाऱ्यांचे लाच घेण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ठोस कारवाई करण्याचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget