एक्स्प्लोर

Nashik Sanjay Raut : आता स्वबळावर 185 आमदार निवडून आणण्याची तयारी ठेवा, संजय राऊतांचे शिवसैनिकांना आवाहन

Nashik Sanjay Raut : आता स्वबळावर 185 आमदार निवडून आणण्याची तयारी केली पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. 

Nashik Sanjay Raut : शिवसेना (shivsena) सोडून गेलेले गद्दार असून तुम्ही कसली क्रांती केली. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या पाठीशी उभा राहून आता जनता क्रांती करेल, आता स्वबळावर 185 आमदार निवडून आणण्याची तयारी केली पाहिजे, असे आवाहन यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. 

नाशिकमध्ये (Nashik) आज संजय राऊत यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांसह राज्य सरकारवर निशाणा साधला. ते यावेळी म्हणाले कि, नाशिकसारखा संताप राज्याच्या कानाकोपऱ्यात घराघरात असून हा संताप सत्ता मिळवून देणार आहे. इतिहास बेईमानाचा लिहिला जात नाही. शिवाजी महाराज यांना 221 लढाया स्वकीय नातीगोत्यामध्ये ल व्या लागल्या. शिवाजी महाराज यांच्यां काळात ही बेईमानी होती. बाळासाहेबांचा तिसरा डोळा प्रखर होता. तुम्ही आणला तो चायनीज माल आहे, फार काळ टिकणार नाही, असे बाळासाहेब म्हणाले होते. अजय बोरस्ते गाडीपर्यंत सोडायला आला, प्राण जाईल पण पक्ष सोडणार नाही, असे म्हटला आता प्राण कुठे अडकला असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. गद्दारांना तुडवा, ही बाळासाहेब यांची भाषा होती, पण हे तुडविण्याचे लायकीचे नाही, हे पळून जातील, शिवसेना सोडून गेलेले गद्दार असून तुम्ही कसली क्रांती केली. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहून आता जनता क्रांती करेल, आता स्वबळावर 185 आमदार निवडून आणण्याची तयारी केली पाहिजे, असे आवाहन  यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संजय राऊत यांनी केले. 

ते पुढे म्हणाले, आज नेहमी पेक्षा जास्त गर्दी असून दोन गेले की 100 अजून येत असतात. 50 गेले की 500 येतात. शिवसेना अस्वलासारखी आहेत, किती केस गेले, कळत नाही. मदारी कोण, भालू कोण? कोणी कळत नाही. दोन मदारी दिल्लीत बसले आहेत. मुख्यमंत्री कोण आहे, शिंदे की फडणवीस कळत नाही. शिवसेनेला खिंडार पडलेले नाही, जनता शिवसेने सोबत आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देत होते, फडणवीस पक्ष संपवीत आहेत, असे म्हणत होते, आता फडणवीस काय एव्हरेस्टवर घेऊन जात आहेत का भगवा फडकविण्यासाठी? चाळीस आमदारांना गाडून भाजप आपला झेंडा फडकवेल हे लिहून घ्या... शिवसेनेने भाजपबरोबर काम केले असल्याने आम्हाला चांगली माहिती आहे. मुबंई, नाशिक, पुणे सर्वत्र शिवसेना जिथल्या तिथे आहे. आता जे अँबुल्सनचा सायरन वाजतो, असे 40 अंबुलन्स लागतील, त्यात त्यांना न्यावे लागेल. आम्हाला जेलमध्ये टाकायचे म्हणतात, तुम्हाला लाथ मारून ढकलतो. दीपक केसरकर म्हणतात तुम्हाला तुरुंगात जावे लागेल. आज जे पक्ष सोडून गेले ते बेईमान पुन्हा घेणार नाही,या से राऊत म्हणाले. 

शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणजे ठिणग्या असून आगीच्या ठिणगीतून वणवा पेटवणार आहे. उध्दव ठाकरे आजारी असताना पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. किती संकटातून ते जात आहेत. शस्त्रक्रिया सुरू असताना 40 लोक पक्ष फोडत होते, याचा सूड घेण्याची वेळ आली आहे. मी 1966 च्या काळात आहोत शिवसेना नव्याने सुरू झाली असे उध्दव ठाकरे बोलतात. वणवा पेटला आहे, ज्याला जायचे त्यांना बँड बाजा देऊ, शिवसेना महासागर आहे. आग पाणी आणि शिवसेना शी खेळू नका. क्रांती केली म्हणतात आरे तुम्ही बेईमान आहात, तुम्ही गद्दारी केली. आपण 145 ची तयारी केली पाहिजे, जर भाजपचे 145 चे मिशन आहे तर शिंदे गटाचे 40 कुठे गेले, आम्ही 185 आमदार निवडून येणार हे दोन्ही घरी जाणार असून दुसरीकडे भाजपचे जेपी नड्डा म्हणतात कि, 45 खासदार निवडून येतील, मग 12 खासदार कुठे गेले, हेंमत गोडसे तर निवडून येणार नाही, असा सूचक विधान राऊत यांनी केले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget