Nashik News : पैशांची बॅग पळवायला आले, मात्र मुलं चोरणारे समजुन जमावाकडून चोप, नाशिकमधील प्रकार
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवेचा मॅसेज (Viral Massage) अद्यापही शहरात फिरतो आहे.
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवेचा मॅसेज (Viral Massage) अद्यापही शहरात फिरतो आहे. अशातच नाशिकच्या गंजमाळ परिसरात मुलं पळविणारे समजून दोघांना जमावाने मारहाण (Beaten) केल्याची घटना घडली आहे. काही वेळातच पोलिसांनी येऊन त्यांना सोडविल्याने पुढील अनर्थ टळला. त्यामुळे पसरलेल्या अफवेने नाशिककर अलर्ट झाले असले तरी अशा घटनांमध्ये नागरिकांनी कायदा हातात न घेता पोलिसांना याबाबत कळविणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लहान मुलं चोरणारी टोळी समजून (Child Trafficking) नाशिकमध्ये पुन्हा एकदा दोघांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिकमध्ये मुलं पळवणाऱ्या टोळी सक्रिय असल्याची अफवा काही दिवसांपासून पसरत आहे. त्यामुळे प्रत्येक जण अज्ञात व्यक्तीकडे संशयाचे नजरेने पाहत आहे. अशातच नाशिकमध्ये एका चार चाकी गाडीतून पैशांची बॅग घेऊन पळण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना मुलं चोर असल्याचे समजून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत संशयित जबर जखमी झाले आहेत.
नाशिक शहरातील गंजमाळ परिसरात दोघे संशयित चोरटे चार चाकी गाडीचा नंबर प्लेटवर कलर टाकून गाडीमध्ये असलेल्या बॅग पळवण्याच्या तयारीत होते. हे वाहन चालकाच्या निदर्शना झाल्यानंतर त्यांनी चोर चोर असा आरडाओरड केला. यामुळे परिसरात नागरिकांनी दोघांना पकडून ठेवले. दरम्यान परिसरातील नागरिकांनी चोर चोर ऐकून मुलं चोर असल्याचे समजून दोघे संशयितांना बेदम मारहाण केली. यात दोघे संशयित जखमी झाले असून हे दोघे भाऊ असल्याचे समजते आहे. तसेच हे दोघे औरंगाबाद येथील रहिवासी असून साहिल लक्ष्मीकुंठे आणि प्रभास लक्ष्मी कुंठे अशी या दोघा संशयितांची नावे आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वेळेत घटनास्थळी जाऊन दोघा संशयितांना जमावाच्या तावडीतून सोडवण्यात पोलिसांना यश आले. यानंतर या दोघांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. मात्र ही घटना बघता नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या मुलं चोरणारी टोळी सक्रिय होण्याच्या अफवांनी नागरिकांवर किती परिणाम केला आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करण्याची वेळ पोलिसांवर वारंवार येत आहे.
नाशिकमध्ये अफवांचे पीक
सध्या नाशिकमध्ये मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असलेल्या आपण चे पीक पसरले आहे. समाज माध्यमांवर तसेच इतर ठिकाणी असा आशयाचा मजकूर देखील व्हायरल होत आहे. तत्पूर्वी पोलिसांनी हा संदेश फेक असल्याची माहिती देखील नाशिककरांना दिली आहे. मात्र नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती त्यांच्या मनात घर करून असल्याचे ही घटना उदाहरण आहे. त्यामुळे नागरिक प्रत्येकाला संशयाचे नगरी नजरेने बघत आहेत. या आधी देखील नाशिकमध्ये ब्लॅंकेट विक्रेत्यांना लहान मूल चोरणारे समजून मारहाण केल्याचे घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा ही घटना समोर आली आहे.