एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : नाशकात लाडकी बहीण योजनेचा इतर दाखल्यांना फटका, आठ दिवसात रखडले हजारो दाखले, नागरिकांचा संताप

Nashik Ladki Bahin Yojana : नाशिकमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जामुळे इतर दाखल्यांना फटका बसत असल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नाशिक : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) अर्जामुळे इतर दाखल्यांना फटका बसत असल्याचे समोर आले आहे. इतर दाखले निकाली निघण्यास तब्बल 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागत आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत अटी-शर्थींसह योजनेच्या सर्व तरतुदींमध्ये बसणाऱ्या सर्व महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. ही योजना जाहीर केल्यानंतर योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्व ठिकाणी महिलांची झुंबड उडाल्याचे चित्र आहे.

आठ दिवसात रखडले 34 हजारांहून अधिक दाखले 

नाशिकमध्ये (Nashik) लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचा इतर दाखल्यांना फटका बसला आहे. दाखले निकाली निघण्यास 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागत आहे. हजारोंच्या संख्येने अर्ज येत असल्याने उत्पन्नाचे दाखले, डोमेसाईल सर्टिफिकेट, जातीचे दाखले मिळण्यास विलंब होत आहे. आपले सरकार पोर्टलच्या सर्व्हरला समस्या असल्याने दाखले देण्यास विलंब होत असून एकट्या नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) आठ दिवसातील रखडलेल्या दाखल्याची संख्या 34 हजाराहून अधिक आहे.  लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असणारे दाखले काढण्यासाठी एकच गर्दी होत असल्याने इतरांना त्याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. 

लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

दरम्यान, लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेचे अर्ज पोर्टल / मोबाइल अँप / सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. नारीशक्ती अॅपवरही अर्ज भरता येईल. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

अर्ज भरण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत

'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी दिलेल्या मुदतीपर्यंत 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व पात्र महिला अर्ज करू शकतात. राज्य शासनानं या योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत 15 जुलैपर्यंतची ठेवली होती. या मर्यादेत शासनाने सुधारणा केली असून आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1 हजार 500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.     

इतर महत्वाच्या बातम्या 

लाडकी बहीण योजना, ॲपमध्ये कोणकोणती माहिती भरायची? सोप्या टिप्स फॉलो करा, निश्चिंत राहा!

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्र्यांना 'लाडकी बहीण' तर, आम्ही कोण? तृतीयपंथीयांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Bulldozer Action : बुलडोझर कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे; सर्वोच्च न्यायालयाकडून कडक ताशेरे
बुलडोझर कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे; सर्वोच्च न्यायालयाकडून कडक ताशेरे
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
The history of Kasmir : औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री  विदर्भात भाजपची  कोंडी करतायत, आशिष  देशमुखांचे आरोपTOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 PM : 13 September 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 12.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सLalbaugcha Raja Darshan Updates : राजाच्या दरबारी भक्तांची वर्गवारी, गरीब-श्रीमंत असा भेद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Bulldozer Action : बुलडोझर कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे; सर्वोच्च न्यायालयाकडून कडक ताशेरे
बुलडोझर कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे; सर्वोच्च न्यायालयाकडून कडक ताशेरे
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
The history of Kasmir : औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
फडणवीसांना आताच दम लागलाय, विदर्भात फक्त 12-13 जागा मिळणार; भाजपच्या सर्व्हेवरून संजय राऊतांची बोचरी टीका
फडणवीसांना आताच दम लागलाय, विदर्भात फक्त 12-13 जागा मिळणार; भाजपच्या सर्व्हेवरून संजय राऊतांची बोचरी टीका
Mumbai Dabbawala home: मोठी बातमी: मुंबईचे डबेवाले आणि चर्मकारांना सरकारचं मोठ्ठं गिफ्ट, 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार
मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, मुंबापुरीत 25 लाखात 500 चौरस फुटांचं घरं, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar Nikki Tamboli :  ''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...'';  जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...''; जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
Embed widget