Malegaon : मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा आरोप, आता CM फडणवीस अॅक्शन मोडवर, घेतला मोठा निर्णय
Malegaon : मालेगावात सुमारे 1 हजार घसुखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय असल्याचा दाखला देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
नाशिक : मालेगाव हे बांग्लादेशी आणि रोहिंग्यांचे आश्रयस्थान बनले आहे. मालेगावात सुमारे १ हजार घसुखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय असल्याचा दाखला देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. मालेगावमध्ये बांगलादेशी नागरिक आणि रोहिंगे बेकायदेशीरपणे राहत आहेत की नाही? याचा शोध घेण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
मालेगाव तहसील कार्यालय, मालेगाव महापालिकेच्या माध्यमातून बनावट जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास समितीची स्थापना करण्यात आली असून नगरविकास शाखेचे विभागीय सहआयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचा या समितीत समावेश आहे.
एसआयटीच्या तपासात नेमकं काय समोर येणार?
तहसील कार्यालय अथवा महापालिकेकडून बनावट जन्म दाखले निर्गमित करण्यात आले आहेत की नाही? याचा तपास करण्याचे आदेश गृह विभागाने या समितीला दिले आहेत. आरोपामध्ये तथ्य आढळल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी उपाययोजना करण्याचे देखील गृह विभागाने म्हटले आहे. या एसआयटीच्या तपासात नेमकं काय समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बांगलादेशी/रोहिंग्या घुसखोरांना मालेगावात जन्म दाखला घोटाळ्याचा
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 8, 2025
तपास करण्यासाठी विशेष तपास समिती (SIT) नेमल्या बद्धल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो
ही समिती बांगलादेशी/ रोहिंग्या घुसखोरांना मालेगावात अवैधरित्या जन्म दाखला दिल्या बाबत तपास करेल@BJP4Maharashtra pic.twitter.com/uCqY5aQ2Wu
किरीट सोमय्यांनी मानले देवेंद्र फडणवीस यांचे आभार
एसआयटी स्थापन केल्याबद्दल किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांना मालेगावात जन्म दाखला घोटाळ्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास समिती (SIT) नेमल्याबद्धल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. ही समिती बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना मालेगावात अवैधरित्या जन्म दाखला दिल्याबाबत तपास करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा