एक्स्प्लोर

शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, आता जयंत पाटलांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

Jayant Patil on Prakash Ambedkar : मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीला शरद पवार यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

नाशिक : शरद पवार (Sharad Pawar) हे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबतच आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Assembly Election 2024) शरद पवार हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करतील, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले आहे. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, पण इतर लहान समाजांनाही सोबत घ्यावं," अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. यावरून प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला. 

लोकांचा गैरसमज करणे चुकीचे

प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर जयंत पाटील म्हणाले की, त्यांनी आरोप केला म्हणजे तसं होतं तसं थोडी आहे. जरांगे स्वतंत्रपणाने त्यांचं आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्या सरकारकडे मागत आहे. सरकार त्या बाबतीत लवकर निर्णय घेत नाही. जरांगेंचं आंदोलन असो किंवा ओबीसी समाजाचं लोकांच्या आंदोलन असो, सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असंतोष आहे. आता हे कोण-कोणाच्या जवळ आहे असे निष्कर्ष काढून लोकांचा गैरसमज करणे हे चुकीचं आहे. ते त्यांच्या जीवावर, ताकदीवर आंदोलन करत आहेत, असा पलटवार त्यांनी केला आहे. 

नेमकं काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर? 

शरद पवार हे जरांगे पाटील यांच्याबरोबर आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीला शरद पवार यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यासाठी ते प्रयत्न करतील, असे देखील स्पष्ट झाले आहे. मात्र शरद पवार यांचा हा प्रयत्न विधानसभेच्या निवडणुकीनंतर होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

गाडीत बसलेल्या माणसाचा एन्काऊंटर करायची गरज काय?

दरम्यान, बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, टोकाचं प्रायश्चित्त व्हायला पाहिजे. त्याला फाशी व्हायला पाहिजे यात कोणाचाही दुमत नाही. प्रश्न एक अक्षय शिंदेने जे कृत्य केले, ज्या संस्थेत केलं त्या संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थाचालकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला? त्यांना कोणाला प्रोटेक्ट करायचं होतं?  पालक पोलिसांकडे गेल्यानंतर गुन्हा नोंदवायला उशीर केला याच्यात कोणाचा दबाव होता? एक स्टोरी म्हणजे त्यांनी पोलिसांची पिस्तुल काढली आणि स्वतःचा शेवट करून घेतला. दुसरी स्टोरी  काही वेळाने बाहेर आली. पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. गाडीत बसलेल्या माणसाचा एन्काऊंटर करायची गरज काय? अक्षय शिंदे याला फाशी व्हावी ही पूर्वीपासूनची मागणी होती. आम्ही अक्षय शिंदेचा कुठेही समर्थन करत नाही, असे त्यांनी सांगितले.  

आणखी वाचा

Akshay Shinde Encounter: '...अन् मी अक्षय शिंदेवर गोळी झाडली'; पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण, FIR मधील जबाब आला समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success story: धाराशीवच्या माळरानावर सिताफळाची सेंद्रीय शेती! शेतकऱ्याला 10 लाखाहून अधिक उत्पन्नाची अपेक्षा
धाराशीवच्या माळरानावर सिताफळाची सेंद्रीय शेती! शेतकऱ्याला 10 लाखाहून अधिक उत्पन्नाची अपेक्षा
Ajit Pawar: एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांचं महत्त्वाचं भाष्य, अक्षय शिंदेच्या पत्नीचा दाखला देत नेमकं काय म्हणाले?
एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांचं महत्त्वाचं भाष्य, अक्षय शिंदेच्या पत्नीचा दाखला देत नेमकं काय म्हणाले?
नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर, जयंत पाटलांसमोरच शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपली
नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर, जयंत पाटलांसमोरच शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपली
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर 'देवाचान्याय' ट्रेडिंग; सोशल मीडियावर जोरदार समर्थन
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर 'देवाचान्याय' ट्रेडिंग; सोशल मीडियावर जोरदार समर्थन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter : फॉरेन्सिक टीम करणार एन्काऊंटर झालेल्या ठिकाणाची पाहणीSushma Andhare : अक्षयला तळोजामधून बदलापूरला न्यायचं होतं मग गाडी मुंब्राकडे का नेली? अंधारेंचा सवालSiddhivinayak Prasad :प्रसादाच्या टोपलीतल्या उंदरांचा व्हिडीओ व्हायरल, मंदिर प्रशासनाने आरोप फेटाळलेदुपारी 2 च्या हेडलाईन्स:  ABP Majha Marathi News : Headlines 2 PM Headlines : 24 September 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success story: धाराशीवच्या माळरानावर सिताफळाची सेंद्रीय शेती! शेतकऱ्याला 10 लाखाहून अधिक उत्पन्नाची अपेक्षा
धाराशीवच्या माळरानावर सिताफळाची सेंद्रीय शेती! शेतकऱ्याला 10 लाखाहून अधिक उत्पन्नाची अपेक्षा
Ajit Pawar: एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांचं महत्त्वाचं भाष्य, अक्षय शिंदेच्या पत्नीचा दाखला देत नेमकं काय म्हणाले?
एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांचं महत्त्वाचं भाष्य, अक्षय शिंदेच्या पत्नीचा दाखला देत नेमकं काय म्हणाले?
नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर, जयंत पाटलांसमोरच शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपली
नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर, जयंत पाटलांसमोरच शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपली
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर 'देवाचान्याय' ट्रेडिंग; सोशल मीडियावर जोरदार समर्थन
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर 'देवाचान्याय' ट्रेडिंग; सोशल मीडियावर जोरदार समर्थन
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत महिलांचा आक्रोश
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत महिलांचा आक्रोश
Badlapur encounter सर्वोच्च न्यायालयाच्या मते एन्काऊंटर हा खून; बदलापूर प्रकरणी असीम सरोदेंची हायकोर्टात याचिका
सर्वोच्च न्यायालयाच्या मते एन्काऊंटर हा खून; बदलापूर प्रकरणी असीम सरोदेंची हायकोर्टात याचिका
Akshay Shinde Encounter: आमच्याकडे घर नाही, आता रोज रेल्वे स्टेशनवर कचऱ्यात झोपतोय; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर आई-वडिलांनी टाहो फोडला
आमच्याकडं घर नाही, आता रोज रेल्वे स्टेशनवर झोपतोय; लेकाच्या एन्काऊंटरनंतर आई-वडिलांनी टाहो फोडला
इलेक्शनची पेटी समोर येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, त्यासाठीच जुगाड केलं, भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट
इलेक्शनची पेटी येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, यासाठीच जुगाड केलं, भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget