(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : पोलीस चौकीत दारू पार्टी करणं पोलिसांना पडलं महाग, आयुक्तांकडून थेट निलंबनाची कारवाई
Nashik Police News : पोलीस चौकीतच ड्युटीवर असताना दारू पार्टी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून नागरीकांना मारहाण झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली होती. आता या पोलिसांवर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
Maharashtra Nashik News : नाशिकच्या दादोजी कोंडदेवनगर परिसरातील पोलीस चौकीमध्ये पोलिसच दारुच्या नशेत धुंद असल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर मद्यधुंद पोलिसांवर निलंबनाची कारवाई नुकतीच आयुक्तांनी केली आहे. नाशिकच्या दादोजी कोंडदेवनगर येथील पोलीस चौकीत दारु पिऊन त्रास देणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी काही नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठलं. पण यावेळी पोलिसच दारु पिताना आढळून आले. ज्यानंतर नागरिकांची तक्रार घेणं तर सोडाच एका नागरिकांना मद्यधुंद पोलिसांनी मारहाण देखील केली.
तर ही संपूर्ण घटना नाशिकच्या दादोजी कोंडदेवनगर परिसरातील पोलीस चौकीत घडली. पोलीस चौकीपासून काही अंतरावर महापालिकाचे गार्डन आहे. परिसर उचभ्र लोकवस्तीचा असल्यानं गार्डन ही टापटीप आहे. मात्र शहरातील काही टवाळखोर पोरं याठिकाणी येऊन दारु पिऊन हैदोस घालत असल्याची घटना मंगळवारी घडली. दरम्यान दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी तेथील रहिवासी बाळासाहेब शिंदें काही जणांसोबत पोलिसांकडे गेले. पण याठिकाणी पोलिसच दारूच्या नशेत झिंगत होते. पोलिसांना याबाबत विचारले असता चौकीची लाईट बंद करून नागरिकांना पोलिसांना मारहाण केली. शिंदे यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमा झाले, मोबाईलमध्ये या सर्वाचे चित्रीकरण झाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणाहून धूम ठोकली.
आयुक्तांकडून अजब दावा करत कारवाईचा बडगा
नागरिकांच्या गदारोळानंतर पोलीस चौकी नीटनेटकी केली मात्र दारूच्या बाटल्या त्याठिकाणीच असल्याने नेमके काय झाले असेल याची कल्पना येत होती. त्यामुळे आता संबधित पोलिसांवर पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. पण पोलिस आयुक्तांनी कारवाई करताना अजब दावा केला असून पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलिसांच्या कृत्याला पोलीस चौकीच्या रचनेला जबाबदार धरले आहे. चौकी पान टपरी सारखी पोलीस चौकी आहे. सुसज्ज पोलीस चौकी असती तर असा प्रकार घडला नसता असा अजब दावा पोलीस आयुक्तांनी केलाय.
हे ही वाचा
- नाशिक महापालिका 'नमामी गंगा'च्या धर्तीवर 'नमामी गोदा' प्रकल्प राबविणार
- Nashik : महापौर, भाजप शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल, कार्यक्रमासाठी परवानगी घेतली नसल्याचा नाशिक पोलिसांचा दावा
- धक्कादायक! एमबीबीएसचा पेपर लातुरात फुटला, विद्यापीठाला दिलेल्या पेपरचीच चार महिन्यांपूर्वी सराव परीक्षा घेतल्याचे झाले उघड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha