मोदी लक्षद्वीपला गेले तर मालदीवला भूकंप आला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून स्तुतीसुमने
रामाच्या पवित्र भूमीत मोदी आले ती गौरवाची बाब आहे अयोध्याच्या राममंदिर उभारणीचे हे शुभ संकेत आहेत . बाळासाहेब ठाकरेंचे यांचं हे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आहे.
नाशिक: राम मंदिर (Ram Mandir) बनवून मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) स्वप्न पूर्ण केले आहे. राम मंदिराअगोदर हा दौरा शुभ संकेत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदी (PM Modi) लक्षद्वीपमध्ये गेले आणि मालदीवमध्ये ( Lakshadweep Maldives controversy ) भूकंप आला, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले. जगात सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून मोदी यांचा उल्लेख करण्यात येतो. राष्ट्रीय युवक महोत्सवाच आयोजन करण्याची संधी दिली हे आमचे सौभग्य आहे. रामाच्या पवित्र भूमीत मोदी आले ती गौरवाची बाब आहे. अयोध्याच्य राममंदिर उभारणीचे हे शुभ संकेत आहेत . बाळासाहेब ठाकरेंचे यांचं हे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आहे.
मोदी लक्षद्वीपला गेले तर मालदीवला भूकंप आला : मुख्यमंत्री
मोदी आहे तर मुमकीन आहे. मोदी लक्षद्वीपला गेले तर मालदीवला भूकंप आला. जगात मोदींचे नाव आदराने घेतले जाते. मोदींना कोणी कोणी बॉस म्हणते तर मोदींसोबत कोणी सेल्फी काढते. मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आपली अर्थ व्यवस्था पोहचली आहे. मोदी देशभक्त राष्ट्रभत नेता आहेत. प्रधानमंत्री झाले हे भाग्यच आहे. भारत जगातील सर्वाधिक युवकांचा देश आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. सकाळी 10.30 वाजता त्याचे निलगिरी बाग येथे आगमन झाले. त्यानंतर नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो झाला. यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते जलपूजन आणि गोदावरीची आरती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरोहित संघाच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी संकल्प करण्यात आला. रामकुंड परिसराला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात दर्शन घेतले. काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात मुख्य दरवाजाने दाखल झाले. येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
हे ही वाचा :