एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

PM Narendra Modi Nashik Visit : पंतप्रधान मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरात महापूजा; येवल्याच्या पैठणीचा शेला देत मोदींचे स्वागत

Modi Kalaram Temple Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिराला भेट दिली. यावेळी मोदींच्या हस्ते विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. येवल्याच्या पैठणीचा शेला देत मोदींचे स्वागत करण्यात आले.

PM Narendra Modi Nashik Visit नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. सकाळी 10.30 वाजता त्याचे निलगिरी बाग येथे आगमन झाले. त्यानंतर नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो झाला. यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते जलपूजन आणि गोदावरीची आरती करण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरोहित संघाच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी संकल्प करण्यात आला. रामकुंड परिसराला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. 

मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरती

काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात मुख्य दरवाजाने दाखल झाले. येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी सर्वप्रथम हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. त्यानंतर प्रधान संकल्प करण्यात आला. यावेळी रामरक्षा पठण देखील करण्यात आली. मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी पंतप्रधान मोदींना पूजा सांगितली. तसेच पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरासमोरील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला अभिवादन केले. 

काळाराम मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप

नाशिकला १३० पोलीस अधिकाऱ्यांसह दोन हजार अंमलदार व राज्य राखीव दलाच्या पाच तुकड्या (एसआरपीएफ), असा सुमारे अडीच हजार अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे. विविध जिल्ह्यांमधून १३ बॉम्ब शोधक-नाशक पथकं दाखल झाले असून यावेळी बॉम्ब शोधक-नाशक पथकाने मोदींच्या काळाराम मंदिर परिसरात जाण्याआधी कसून तपासणी केली. अनेक पोलीस या ठिकाणी दाखल झाल्याने काळाराम मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले.  

काळाराम मंदिराची माहिती

काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७७८-१७९० मध्ये बांधले. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात. 

पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

दरम्यान, काळाराम मंदिराचे दर्शन उरकून नरेंद्र मोदी हे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहे. यात 8 हजार युवकांनी सहभाग नोंदवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युवकांना काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP MajhaAvinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 01 December 2024ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 December 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Embed widget