एक्स्प्लोर

मोठी बातमी : गोडसेंपाठोपाठ छगन भुजबळही तडकाफडकी मुंबईला रवाना, नाशिकच्या जागेचा तिढा वाढणार?

Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून खासदार हेमंत गोडसे मुंबईला रवाना झाले. त्यांच्या पाठोपाठ आता छगन भुजबळदेखील मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Nashik Lok Sabha Constituency : महायुतीत (Mahayuti Seat Sharing) नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या जागेवर दावेदारी करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उमेदवारी मिळण्याची संकेत आहेत. त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) पुन्हा एकदा तातडीने मुंबईला रवाना झाले. आता गोडसेंपाठोपाठ छगन भुजबळदेखील मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. यानंतर नाशिकच्या महायुतीच्या इच्छुकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. भाजपची नाशिकमध्ये अधिक ताकद आहे, असे म्हणत नाशिक भाजपकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आला. तर दिल्लीतून नावाची चर्चा झाली, असे म्हणत छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) रणशिंग फुंकले. 

हेमंत गोडसे बंडखोरी करणार? 

छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) उमेदवारी मिळणार असे समजताच हेमंत गोडसे तडकाफडकी मुंबईला रवाना झाले. हेमंत गोडसे आणि शिवसेना पदाधिकारी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ही नाशिकची जागा शिवसेनेला (Shiv Sena) सुटली नाही तर गोडसे बंडखोरी करत अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते. हेमंत गोडसेंनी बंडखोरी केल्यास नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळणार आहे. 

भुजबळ मुंबईत कुणाची भेट घेणार?

गोडसेंपाठोपाठ छगन भुजबळदेखील मुंबईला (Mumbai) रवाना झाले आहेत.  गोडसे मुंबईत असताना भुजबळही मुंबईच्या दिशेने निघाल्याने चर्चांना उधाण आले आहे. भुजबळ मुंबईत कुणाची भेट घेणार ? उमेदवारीबाबत काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई दौरा आणि उमेदवारी याचा काही संबंध नसल्याचे भुजबळ यांच्या गोटातून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र आज नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नाशिकमधून भुजबळ की गोडसे?  कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : तिकीट कापलेले भाजप खासदार थेट मातोश्रीवर, ठाकरे गटात प्रवेश करुन मैदानात उतरणार?

Nashik Loksabha : छगन भुजबळांना लोकसभा निवडणुकीत मराठा समाज घाम फोडणार? मराठा क्रांती मोर्चाचा गंभीर इशारा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Embed widget