एक्स्प्लोर

कर्तृत्व नसलेले जातीवर मतदान मागतात, भुजबळांचा निशाणा कुणावर?; नाशिकचं राजकारण तापणार

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहे.

Nashik Lok Sabha Constituency : '2014 साली नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) निवडणुकीत मी केलेली विकासकामे बाजूला राहिली आणि जात आडवी आली. ज्यांचे काहीच कर्तुत्व नाही ते जातीवर मतदान मागतात' असा टोला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अप्रत्यक्षपणे हेमंत गोडसेंना (Hemant Godse) यांना लगावला आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिकचे राजकारण (Nashik Politics) तापण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये (Nashik) केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहे. 'मी सध्या ओबीसीसाठी (OBC) लढतोय, पण या लढ्यात फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते, विकास बाजूला राहतो आणि जात बघितली जाते' असं भुजबळ यांनी म्हंटलय. रविवारी सायंकाळी नाशिकच्या औरंगाबादकर सभागृहात आयोजित माळी समाज सेवा समिती आयोजित फुलला माळ्यांचा मळा या डॉक्टर कैलास कमोद लिखित पुस्तकाचे प्रकाशन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

सगळं बाजूला गेले अन् जात आडवी आली...

पुढे बोलतांना भुजबळ म्हणाले की, "लोकसंख्या जास्त दिसली, आमदारांची घरे जाळली की माणूस मोठा होतो. एक नेता मराठा होता बाकी ओबीसी होतेना. भुजबळ कशाला आपल्या माणसांची घर जाळेल. अशावेळी तुम्ही गप्प बसता, या लढ्यात फायद्यापेक्षा नुकसान अधिक होते. जातीवरून मतदान होते आणि विकास बाजूला राहतो. असे नाशिकमध्येच घडले.  नाशिकचा ब्रिज मी केला, त्र्यंबकेश्वर रोडवरचे रिसॉर्ट, वणीला सप्तशृंगी ट्रॉली, नाशिक एअरपोर्ट,  गंगापूर बोट क्लब केले. सगळं बाजूला गेले आणि जात आडवी आली. निवडणुकीत जातीला महत्व दिले गेले. ज्यांचे काहीच कर्तुत्व नाही ते जातीवर मतदान मागतात, असे भुजबळ म्हणाले. 

जरांगेंची दुसरी मोहीम

दरम्यान याच कार्यक्रमात बोलतांना, “2010 साली माझ्यामुळे मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळाले नाही असं ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी स्पष्ट करत जरांगेची ही दुसरी मोहीम आहे, जरांगे बोलला पहिल्याच भाषणात की कसबेनी घातलेला खुंटा उपटणार पण जरांगेने काय केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

मराठा आरक्षणाची 2010 ला सेटिंग झाली होती...

पुढे बोलतांना कसबे म्हणाले की, “2010 च्या दशकात ज्या वेळी तुमचं आरक्षण पूर्ण धोक्यात आले होते, मराठे ओबीसीमध्ये जाणार होते. सध्या किती भ्रष्टाचार, राजकारणात नितीमत्ता नसते हे खरं आहे. 2010 ला सेटिंग झाली होती, बहुमत झाले होते. भुजबळांना सगळे माहीत आहे. मराठ्यांचा ओबीसीत समावेश होणार हे ठरलं होतं. मी त्याला कडाडून विरोध केला, एकामताने आम्ही मराठ्यांना बाहेर काढलं. आता जरांगेची ही दुसरी मोहीम, जरांगे बोलला पहिल्याच भाषणात की कसबेनी घातलेला खुंटा उपटणार पण जरांगेने काय केले? असे कसबे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nashik Lok Sabha 2024 : नाशकात गोडसेंविरुद्ध सक्षम उमेदवार देण्यासाठी मविआचा मास्टर प्लॅन, 'या' बड्या नेत्याला लोकसभेचं तिकीट?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Happy Birthday Diljit : गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
Torres Scam Mumbai: रविवारी पैसे गुंतवा, शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न्स; टोरेस कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणुकदारांना चुना कसा लावला?
रविवारी पैसे गुंतवा, शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न्स; टोरेस कंपनीने मुंबईतील गुंतवणुकदारांना चुना कसा लावला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 07 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 630AM 07 January 2025 माझं गाव, माझा जिल्हासकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 07 January 2025  06AM SuperfastCRZ Scam Special Report | मुंबईत कोट्यवधींचा सीआरझेड घोटाळा, भूमी अभिलेखच्या नकाशांमध्ये फेरफार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Happy Birthday Diljit : गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
Torres Scam Mumbai: रविवारी पैसे गुंतवा, शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न्स; टोरेस कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणुकदारांना चुना कसा लावला?
रविवारी पैसे गुंतवा, शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न्स; टोरेस कंपनीने मुंबईतील गुंतवणुकदारांना चुना कसा लावला?
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
Maharashtra Weather Today: चक्राकार वारे मध्य महाराष्ट्रावर, आता थंडीचा जोर वाढणार, येत्या 2 दिवसात हवामान कसे? वाचा
चक्राकार वारे मध्य महाराष्ट्रावर, आता थंडीचा जोर वाढणार, येत्या 2 दिवसात हवामान कसे? वाचा
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
Embed widget