एक्स्प्लोर

Chandanpuri Yatrotsav 2024 : चंदनपुरीच्या खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ; 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोष दुमदुमले 'प्रति जेजुरी'

Chandanpuri yatrotsav : भंडारा-खोबऱ्याची मुक्त उधळण करीत, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोटचा जयघोष करीत गुरुवारी मालेगाव येथील चंदनपुरी यात्रोत्सवास प्रारंभ झाला.

Nashik Malegaon News मालेगाव : भंडारा-खोबऱ्याची मुक्त उधळण करीत, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोटचा जयघोष करीत गुरुवारी प्रति जेजुरी म्हणून संबोधल्या गेलेल्या नाशिकच्या मालेगाव येथील चंदनपुरी यात्रोत्सवास (Chandanpuri Yatrotsav) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सपत्नीक महापूजा करत वाघ्या मुरळीसह खंडोबाची तळी भरली. 

श्री क्षेत्र चंदनपुरी हे खंडेराव महाराजांच्या दुसरी पत्नी बानुबाईची माहेर असून खंडेराव महाराज (Khanderao Maharaj) चंदनपुरी येथे वास्तव्यास असताना सेवा केल्याने खंडेराव महाराज तिच्या प्रेमात पडले अशी आख्यायिका आहे. बानू आणि खंडेरायाचे वास्तव असल्याच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून दरवर्षी पौष पौर्णिमाचे निमित्ताने पंधरा दिवस ही यात्रा भरवली जाते.

हजारो भाविकांची उपस्थिती

चंदनपुरीचा (Chandanpuri) यात्रोत्सवात तळी भरणं, नवस फेडणे, जागरण - गोंधळ यासह अनेक कार्यक्रम पार पडतात. या यात्रेच्या निमित्ताने भंडाऱ्याची उधळण करत मानाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. हजारो भाविकांनी या पालखी मिरवणूक सोहळ्यात सहभाग घेतला. 

संपूर्ण देशाची प्रगती होऊ दे, पालकमंत्र्यांनी घातलं साकडं

यावेळी पालकमंत्री दादा भुसे म्हणाले की, चंदनपुरी येथे दरवर्षी प्रमाणे यात्रा संपन्न होत आहे. यात्रेचा शुभारंभ आज करण्यात आला. या वर्षी अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले. यामुळे शेतकरी बांधव अडचणीत सापडला आहे. शेतकरी  बांधवांचे दुखः लवकरात लवकर दूर होऊ दे, संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती होऊ दे, देशाची प्रगती होऊ दे,  अशी प्रार्थना खंडेराव महाराजांच्या चरणी केली. 

...तर ग्रामपालिकेशी संपर्क साधा

चंदनपुरीतील यात्रोत्सव (Chandanpuri Yatrotsav) साधारण २५ दिवस चालतो. यावेळी देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. चंदनपुरी हे  बानू मातेचं माहेर आहे. त्यामुळे खंडेराव महाराजांनी (Khanderao Maharaj) येथे वास्तव्य केले असल्याने ही भूमी पावन झाली आहे. अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांनी येथे खंडेराव महाराजांचे मंदिर बांधले आहे. ग्रामपालिकेतर्फे यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. भाविकांना कुठलीही अडचण आल्यास त्यांनी ग्रामपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच विनोद शेलार (Vinesh Shelar) यांनी केले आहे. 

आणखी वाचा

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजरांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

Nashik Onion : कांद्याचे दर पुन्हा गडगडले; शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटलमागे होतेय 600 रुपयांचे नुकसान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget