Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजरांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर
Nashik News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात शिवसेनेच्या उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
Sudhakar Badgujar नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दाखल केलेल्या गुन्ह्यात शिवसेनेच्या उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना जिल्हा सत्र न्यायालयाने (District Sessions Court) सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर (Anticipatory Bail Granted) केला आहे. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बडगुजर यांचे गोठविलेले (सीझ) खाते सुरू करण्याचा त्यांचा अर्ज मात्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने सुधाकर बडगुजर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या महिन्यात १७ तारखेला सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) सुधाकर बडगुजर, सुरेश चव्हाण, रामदास शिंदे यांच्याविरोधात पदाचा दुरुपयोग करीत महापालिकेच्या कंत्राटात आर्थिक लाभ घेत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम (Praveen Gedam) यांच्या तक्रारीनुसार खुली चौकशीअंती हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अखेर बडगुजरांना जामीन मंजूर
या विरोधात बडगुजर यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. त्यावर गेल्या तीन आठवड्यांपासून कामकाज सुरू होते. बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम.आय. लोकवाणी यांनी सुधाकर बडगुजर, रामदास शिंदे, सुरेश चव्हाण यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
'या' आहेत अतिशर्ती
५० हजार रुपयांचे जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर करण्यात आले आहे. तपासी पथकाच्या चौकशीत हजर राहणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या परवानगीशिवाय परदेशात न जाणे, साक्षीदारांना न धमकावणे आदी अटीशर्थीही लादण्यात आलेल्या आहेत.
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
नाशिक महापालिकेत ठेकेदारपासून ते शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा राजकीय क्षेत्रातील प्रवास विलक्षण राहिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. शिवसेना पक्षासह महानगरपालिकेत अनेक महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाली आहे.
नितेश राणेंनी केला होता बडगुजरांवर आरोप
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी पार्टी केल्याचा आरोप नागपूर अधिवेशनात आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. नितेश राणेंच्या आरोपानंतर सुधाकर बडगुजर यांच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली.
आणखी वाचा
Nashik Onion : कांद्याचे दर पुन्हा गडगडले; शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटलमागे होतेय 600 रुपयांचे नुकसान