(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सलीम कुत्तासोबतची पार्टी भोवली, नाशिकचे ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजरांवर अखेर गुन्हा दाखल
Nashik Crime News : आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बडगुजर यांच्या नातेवाईकांच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ता सोबत झालेल्या पार्टी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime News : नाशिकचे ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सलीम कुत्ता (Salim Kutta) सोबत पार्टी केल्याच्या प्रकरणामुळे बडगुजर चर्चेत आले होते आणि आता तेच प्रकरण त्यांना भोवले असल्याची चर्चा आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बडगुजर यांच्या नातेवाईकांच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ता सोबत झालेल्या पार्टी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुबई बॉम्ब स्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपी सलीम कुत्ता बरोबर सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा एक तथाकथित व्हिडिओ समोर आला होता. तर, गेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे, शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी सलीम कुत्ता पार्टी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. याच प्रकरणात नाशिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशी करण्यात येत होती. या पार्टीत बडगुजर उपस्थित होते, काही भेटवस्तू दिल्या गेल्या असे पोलीसांच्या चौकशीत झाले निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलाम अंतर्गत बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कारवाईनंतर आता ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे.
पार्टीत भेटवस्तू दिल्या गेल्या....
मागील हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मुबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप राणे यांनी केला होता. याबाबतचा एक व्हिडिओ देखील त्यांनी ट्वीट केला होता. याचवेळी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात होती. पुढे नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या वतीने या प्रकरणाचा तपास सुरु झाला. पोलिसांनी केलेल्या तपासात काही गोष्टी समोर आल्यावर अखेर सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्टीत बडगुजर उपस्थित होते, काही भेटवस्तू दिल्या गेल्या असे पोलीसांच्या चौकशीत झाले निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे आडगाव पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल झाला आहे.
बडगुजर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ
सलिम कुत्ता पार्टी प्रकरणावरून बडगुजर यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. पुढे हे प्रकरण अधिकच चर्चेत आले. अशात एसीबीने काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या एका प्रकरणात बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता मुबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता बरोबर पार्टी केल्या प्रकरणी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलाम अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याची चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठे फेरबदल, विजय करंजकरांची उमदेवारी निश्चित?