Nashik Vikhe Patil : सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले...
Nashik Vikhe Patil : सत्यजित तांबे आणि भाजपचे समीकरण काय याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
Nashik Vikhe Patil : सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याबद्दल लवकरच पक्ष भूमिका जाहीर करणार आहे. पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कार्यकर्ते काम करतील असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या बाबत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भूमिका स्पष्ट करावी असे थेट आव्हान त्यांनी केले आहे.
दिवसेंदिवस नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची चुरस वाढत असून यातून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. यावर विखे पाटील म्हणाले कि, त्यात सत्यजित तांबे आणि भाजपचे समीकरण काय याबद्दल अजूनही अधिकृत अशी स्पष्टता प्राप्त झाली नाही. त्यात आता भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल लवकरच पक्ष भूमिका जाहीर करणार आहे. पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कार्यकर्ते काम करतील असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सत्यजित तांबे यांच्याबाबत बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट करावी असे थेट आव्हान त्यांनी केले आहे.
विखे पाटील हे आज नाशिकमध्ये होते. नाशिकमध्ये आज पासून कृषी महोत्सवाला सुरुवात झाली असून या कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Rahdakrushana Vikhe Patil) यांनी हजेरी लावली. यावेळी बोलत होते ते म्हणाले, की शेतीमाल विकावा लागतो, बाजार समिती साठवणूककडे लक्ष दिले पाहिजे, असे सल्ला त्यांनी यावेळी दिला. पण व्यवस्था सक्षम झाली नाही, हे दुर्दैव आहे. कृषी पणन यांची सांगड घातली पाहिजे. दोन्ही खाते दोन वेगवेगळ्या लोकांकडे असतात असे त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे राज्यामध्ये साखर कारखानाचे कर्ज होते. त्यांना कालच्या केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि राज्य सरकारच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या भेटीने दिलासा मिळेल. धोरणात बदल होतील. तसेच खुल्या बाजार पेठेत साखर विकता येईल. साखर कारखाना बरोबर प्राथमिक सोसायटीचे काम होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या गौण खनिजाबाबत ते म्हणाले कि, गौण खनिज बाबत पुढील आठवड्यात धोरण घेतले जाईल, असे ते म्हणाले.
पटोलेंनी नाकाला हात लावून बघावं...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काल नाशिकमध्ये भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाकडे पदवीधरला उमेदवार नाही मिळाला भाजपचे नाक कापल्याचा टोला त्यांनी लगावला होता. त्यावर आता विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले नाना पटोले यांनी आपल्या नाकाला हात लावून बघायला पाहिजे, राज्यात काँग्रेसची काय अवस्था आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांवर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला. ते सरकार जनतेच्या मनातील नव्हते. आताचे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.