एक्स्प्लोर

Video : MG ZS EV कारची ऑटोमॅटिक सिस्टीम फेल; वसईतील डॉक्टर दाम्पत्याचा थरारक अनुभव

Vasai Car Accident : वसईतील सन सिटी येथील वीरचंदानी बिल्डिंगमध्ये शनिवारी सायंकाळी एक गंभीर अपघात टळलाय. डॉक्टर मिथिलेश मिश्रा आणि त्यांच्या पत्नीवर थरारक प्रसंग ओढवला,

Vasai Car Accident वसई : वसईतील सन सिटी येथील वीरचंदानी बिल्डिंगमध्ये शनिवारी सायंकाळी एक गंभीर अपघात टळलाय. डॉक्टर मिथिलेश मिश्रा आणि त्यांच्या पत्नीवर थरारक प्रसंग ओढवला, जेव्हा त्यांच्या नव्याकोऱ्या MG ZS EV या फुल्ली ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक गाडीची सिस्टीम अचानक फेल झाली आणि गाडी पलटी झाली. विशेष बाब म्हणजे, अपघाताच्या वेळी गाडीत एकही एअरबॅग उघडली नाही आणि दरवाजे लॉक झाल्याने दोघेही गाडीत अडकले होते. मात्र सुदैवाने त्यात कोणतीही जखम त्यांना झाली नाही.

पुढे आलेल्या माहितीनुसार, शनिवारी डिनरसाठी घराबाहेर पडण्यासाठी डॉक्टर मिश्रा आणि त्यांची पत्नी गाडीत बसले. अवघ्या महिनाभरापूर्वी घेतलेली MG ZS EV कार त्यांनी सुरू केली आणि ड्रायव्हिंग मोडमध्ये टाकली. मात्र, ब्रेक रिलीज होत नव्हता, त्यामुळे गाडी पुढे सरकत नव्हती. गाडीतून न्यूट्रल आणि ड्रायव्हिंग मोडमध्ये फेरबदल करत असताना गाडी अचानक वेगाने सुरू झाली. यावेळी गाडीसमोर एक व्यक्ती उभा असल्याने त्याला वाचवण्यासाठी डॉक्टर मिश्रा यांनी गाडी डावीकडे वळवली.

अपघातानंतर एअरबॅगसह कोणतेही सेफ्टी फिचर्स सुरू झालेच नाहीत

मात्र समोरच सोसायटीच्या फायर सेफ्टी पाइपशी गाडी धडकली आणि थेट पलटी झाली. धडक देताच गाडीचे सर्व दरवाजे लॉक झाले आणि एअरबॅगसह कोणतेही सेफ्टी फिचर्स सुरू झाले नाहीत. या अपघातानंतर गाडीतील कोणतीही सेफ्टी सिस्टम – जसे की ऑटो ब्रेक, एअरबॅग किंवा इमर्जन्सी अलर्ट, सक्रिय झाली नाही. गाडीत अडकलेले डॉक्टर दांपत्य सुमारे काही मिनिटे मदतीची वाट पाहत होते. अखेर सोसायटीतील स्थानिकांनी प्रसंगावधान राखत गाडीची सनरूफ फोडून त्यांना बाहेर काढले.

ग्राहकांच्या जीवाशी असा खेळ नको- डॅा. मिथिलेश मिश्रा

या धक्कादायक घटनेनंतर डॉक्टर मिथिलेश मिश्रा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “अशी महागडी आणि सेफ्टी फिचर्सने युक्त असल्याचा दावा करणारी कार जर एवढा मोठा धोका निर्माण करू शकते, तर रस्त्यावर चालवताना किती मोठा अनर्थ घडू शकतो याची कल्पनाही करवत नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी MG मोटर्स कंपनीकडे आणि संबंधित यंत्रणांकडे प्रश्न उपस्थित करत सांगितले की, “गाडी रस्त्यावर उतरवण्याआधी तिची संपूर्ण तपासणी झाली पाहिजे. ग्राहकांच्या जीवाशी असा खेळ नको.” असे डॅा. मिथिलेश मिश्रा म्हणालेत. मात्र या घटनेमुळे MG ZS EV सारख्या महागड्या आणि नावाजलेल्या गाड्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्या असून, संबंधित कंपनीने याचे गांभीर्याने स्पष्टीकरण देणे आवश्यक झाले आहे.

आणखी वाचा

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger: मोठी बातमी : विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
Hasan Mushrif On Satej Patil : कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
Ahilyanagar District Bank: अखेर अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा फैसला! अध्यक्षपदी डॉ.सुजय विखे; तर उपाध्यक्षपदी रणजित देशमुख यांची एकमताने निवड, राजकीय चर्चांना पूर्णविराम!
अखेर अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा फैसला! अध्यक्षपदी डॉ.सुजय विखे; तर उपाध्यक्षपदी रणजित देशमुख यांची एकमताने निवड, राजकीय चर्चांना पूर्णविराम!
Hasan Mushrif and Satej Patil: मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif and Satej Patil: मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut:
"विलीनीकरण-विलीनीकरण, किंवा ऑलम्पिक खेळ खेळता येईल का? मर्जर-मर्जर, फार इंट्रेस्टिंग..."; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचा मिश्कील टोला, नेमकं काय म्हणाले?
Hardik Pandya MI: आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
Hasan Mushrif On Satej Patil : कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
Tukaram Mundhe on Milk and Ghee: तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
NCP Merger: मोठी बातमी : विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
Sinhagad Educational Institute: सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
Pune Crime News: पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
Embed widget