एक्स्प्लोर

लॉजमध्ये थांबले, सकाळपासून रूमचं दार उघडलंच नाही, वेटरला संशय आला, दार उघडताच... नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार

रूम सर्व्हिससाठी वेटरने खूप वेळा दार वाजवलं तरीही आतून कसलाच आवाज न आल्यानं रूमचं दार उघडण्यात आलं त्यावेळी...

Nanded: नांदेडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे .कंधार तालुक्यातील एका खासगी संस्थेवर काम करणाऱ्या शिक्षकाचा एका लॉजमध्ये मृतदेह आढळून आला आहे . अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव पाटील जवळ असणाऱ्या हॉटेल्स स्वराज्य लॉजमध्ये शनिवारी (2 Aug ) सकाळी ही घटना घडली .
आशिष भाऊसाहेब शिंदे असं मृत शिक्षकाचे नाव आहे .  रूम सर्व्हिससाठी वेटरने खूप वेळा दार वाजवलं तरीही आतून कसलाच आवाज न आल्यानं रूमचं दार उघडण्यात आलं त्यावेळी आशिष शिंदे या शिक्षकानं पंख्याला गळफास लावून घेतल्याचं समोर आलं आहे . (Nanded news )

नेमकं घडलं काय ?

नांदेड मधील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव  परिसरात हॉटेल स्वराज फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉज मध्ये आशिष भाऊसाहेब शिंदे हे शिक्षक मुक्कामास होते . शनिवारी सकाळी शिंदे आपल्या रूममध्ये मृत अवस्थेत आढळून आले .रूम सर्विस साठी सकाळपासून वेटरने दरवाजा वाजवला तरीही आतून कसलेही उत्तर किंवा आवाज आला नाही .संशयास्पद परिस्थिती वाटल्याने त्यामुळे हॉटेल रूमचा दरवाजा तोडण्यात आला . दरवाजा तोडताच आशिष शिंदे यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला .

हॉटेलच्या व्यवस्थापकाने तात्काळ अर्धपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली . त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली .पोलिसांनी शिक्षक आशिष शिंदे यांना रुग्णवाहिकेने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं .डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर क्षमविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला .व त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून शिक्षकाने आत्महत्या का केली यासंदर्भात तपास सुरू आहे .या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .

जीवे मारण्याची धमकी देत दुसऱ्या गावात घेऊन गेला

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एका गावातल्या एका 20 वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एका गावातल्या एका 20 वर्षीय तरुणीला अहिल्यानगर येथे नेत दोन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारी वरून जऊळका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तनुज गौरकार याला अटक करण्यात आली आहे.एप्रिल महिन्यात आरोपीने या तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील घडवणी या गावात ठेवलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शरिरसंबंध ठेवले, अखेर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
Pune Crime News: शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
Ramesh Mhatre: डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
Influencer Attacked: LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले
LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget