Nashik Protest : नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेड, स्वराज्य संघटना आक्रमक; जालना घटनेच्या निषेधार्थ आंदोलन
Nashik News : जालना (Jalana) येथील घटनेच्या निषेधार्थ नाशिकमधील (Nashik) मराठा संघटना आक्रमक झाल्या असून आंदोलन करण्यात येत आहेत.
नाशिक : जालना (Jalana) येथील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून अनेक भागात आंदोलन करण्यात येत आहेत. नाशिकमध्ये (Nashik) मराठा संघटना आक्रमक झाल्या असून संभाजी ब्रिगेड आणि स्वराज्य संघटेनच्या (Sambhaji Briged) माध्यमातून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन करण्यात येत असून घटनेच्या तळापर्यंत जाऊन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा बांधवांकडून (Maratha Reservation) उपोषण सुरु होते. मात्र आंदोलकांना उपोषणासाठी (Jalna Maratha Reservation Protest) विरोध करत पोलिसांनी आक्रमक होत आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केली. यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे समोर येत आहे. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आता राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. राज्यातील अनेक भागात आंदोलन (Protest) सुरु असून अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील आंदोलन करण्यात येत आहे. संभाजी ब्रिगेड, स्वराज्य संघटनेकडून (Swarajya Sanghtana) आंदोलन करण्यात येत आहे. स्वराज्य संघटनेकडून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे. नाशिकमध्ये देखील स्वराज्य संघटना आक्रमक झाली असून आज आंदोलनाची हाक दिली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे नेते करण गायकर (Karan Gaikar) म्हणाले की, मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला असून याचा स्वराज्य पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांना विनंती आहे, की जालना जिल्ह्याच्या एसपींना तात्काळ निलंबित करुन मराठा समाजाच्या भावना समजून मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा राज्यभर आपल्या सरकारचा निषेध करत स्वराज्य पक्ष मोठे जनआंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. तसेच घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. तसेच स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी आज जालना जिल्ह्यातील घटनास्थळी भेट दिली असून आंदोलकांशी चर्चा केली आहे.
काय घडलं जालन्यात?
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या चार दिवसापांसून उपोषण सुरु होते. स्थानिक कार्यकर्ते असलेले, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु होतं. दरम्यान शुक्रवारी जरांगे यांना पोलीस रुग्णालयात नेण्यासाठी आले असता, आंदोलक आणि पोलिसांत झडप होऊन दगडफेकीसह लाठीचार्ज झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे पडसाद आता जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रात उमटत आहेत. कालच उशिरा अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या. आज सकाळपासून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेच्या उच्चस्थरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र आज महाराष्ट्रभरात मराठा संघटनांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी :
Jalna Lathicharge Maratha Reservation : लाठीचार्ज, गोंधळ, जाळपोळीनंतर जालन्यात सध्या वातावरण कसं?