Nashik Crime : आधी मुलाने नंतर बापाने केली एकमेकांना रॉडने मारहाण, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू, चांदवड येथील घटना
Nashik Crime : बाप मुलाच्या एकमेकांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या (Nashik) चांदवड (Chandwad) तालुक्यात घडली आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात कौटुंबिक वादातून आत्महत्या (Suicide), खून (Murder) अशा घटना सद्यस्थितीत वाढल्या आहेत. मालेगाव शहरात खुनाची घटना ताजी असतानाच आता चांदवड (Chandwad) तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकमेकांना केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू (Youth Death) झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.
चांदवड तालुक्यातील पाटे शिवारात हि घटना घडली आहे. येथील नारायण खेडे येथे ठोके परिवार वास्तव्यास असून त्यांच्या मुलास मद्याचे व्यसन असल्याने तो कुटुंबीयांकडे सतत लग्नाचा तगादा लावत असे. रविवार सायंकाळी ठोके यानाचा मुलगा मद्य पिऊन घरात आला. त्याने मद्यधुंद अवस्थेत वडिलांना स्वतःच्या लग्नाबद्दल विचारणा केली. यावेळी वडिलांनी दारूचे व्यसन सोडून दे असे मुलाला सांगितले. यानंतर मुलाने संतप्त होत वडिलांना शिवीगाळ सुरू केली. घरात ठेवलेली पहार आणत वडिलांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला आणि त्यांना जखमी केले.
दरम्यान यानंतर वडिलांनी देखील जखमी अवस्थेत घरातून रॉड शोधून काढला. मुलाला रॉडच्या साहाय्याने मारहाणीला सुरवात केली. वडिलांच्या जबर मारहाणी मात्र मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वडिलांविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारभारी रावबा ठोके यांचा मुलगा रवींद्र कारभारी ठोके हा रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दारू पिऊन घरी आला. त्यावेळी त्याने वडिलांना विचारले माझे लग्न कधी करून देता? त्याला वडिलांनी सांगितले कि, आधी दारू सोड मग लग्नाचे बघू?
रवींद्र याच्या वडिलांनी असं सांगितल्यावर याचा राग आल्याने संतप्त होत त्याने दारूच्या नशेत घरात ठेवलेली लोखंडी पहार कारभारी यांच्या डोक्यात मारली. यात वडील गंभीर जखमी झाले. जीव वाचवण्यासाठी कारभारी ठोके यांनी रवींद्रच्या डोक्यात हातापायावर लोखंडी रॉडने वार केले. या हल्ल्यात मुलगा रवींद्र हा मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याने रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या :
Nashik : नाशिककरांनाही रानभाज्यांची चव चाखता येणार, पंचायत समितीत खास रानभाज्या महोत्सव