एक्स्प्लोर

Nashik Satyajeet Tambe: सत्यजीत तांबे पदवीधरांसाठी योग्य उमेदवार, नाशिक मतदारसंघातून शिक्षक संघटनांचा पाठिंबा

Nashik, Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी विविध शिक्षक संघटना पाठिंबा जाहीर करत आहेत.

Nashik, Satyajeet Tambe : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Elections) उतरलेल्या सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा देण्यासाठी विविध शिक्षक संघटना पाठिंबा जाहीर करत आहेत. डॉ. सुधीर तांबे यांच्याप्रमाणेच सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Padvidhar Election) सध्या उमेदवारांचे प्रचार दौरे सुरु आहेत. सत्यजीत तांबे यांना पाठिंबा वाढत असून महाराष्ट्र मस्ट संघटनेने पाठिंबा दिल्यानंतर टीडीएफ (TDF) या संघटनेने देखील त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, चाँद सुलताना अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, रिपाई (गवई गट), स्वाभिमानी शिक्षक संघटना (अहमदनगर जिल्हा), सैनिक कल्याण समिती, संगमनेर, अॅग्रीकल्चरल मायक्रो ऑर्गनिझम मॅन्युफॅक्चरर्स अँड फार्मर्स असोसिएशन या संघटनांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिला आहे. 

स्वाभिमानी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देताना शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे. सैनिक कल्याण समिती, संगमनेर यांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देताना म्हटले आहे की, उच्चशिक्षित, सहृदयी, पित्याचा वारसा आपल्याकडे असल्याने आपण या पदासाठी योग्य उमेदवार आहात असे म्हटले आहे. अॅग्रीकल्चरल मायक्रो ऑर्गनिझम मॅन्युफॅक्चरर्स अँड फार्मर्स असोसिएशनने म्हटलंय की, कृषी पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी तरुण आणि धडाडीचे नेतृत्व लाभणार असल्याने आमच्या संघटनेचे सगळे पदवीधर आपल्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत. रिपाइं (गवई गट) ने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देत असताना अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार या 5 जिल्ह्यांसह 54 तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रचार यंत्रणेत सामील करून घेण्याची विनंती केली आहे. 

यापूर्वी सत्यजीत तांबे यांना महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (MUST) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे यांना या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला असून त्याबाबतचे पत्रही त्यांनी सत्यजीत तांबे यांना दिले आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगावमधील सगळ्या पदवीधर मतदारांनी सत्यजीत तांबे यांच्या नावासमोर 1 क्रमांक लिहून त्यांना या निवडणुकीत प्रचंड बहुमताने जिंकवावे, असे आवाहन मस्ट या संघटनेने केले आहे. 

सत्यजीत तांबे यांना वाढता पाठिंबा...

महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पदवीधरांना सत्यजीत तांबे यांच्यात समस्यांचे निराकरण करणारा आशेचा किरण दिसत आहे. त्यांच्या विजयात आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने मनिष गावंडे, महाराष्ट्र खासगी शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून सत्यजीत तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे. नाशिक विभागातील संघटनेचे पदाधिकारी आणि हितचिंतक शिक्षक हे सत्यजीत तांबे यांच्या विजयासाठी निष्ठेने काम करतील असे आश्वासनही गावंडे यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik chhagan Bhujbal : भाजपचा पाठिंबा तांबेंना मिळेल, मात्र थोरातांना अडचणीत आणलं, छगन भुजबळ म्हणाले... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget