एक्स्प्लोर

Bhusawal Earthquake : भुसावळ शहर परिसरात 3.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

Bhusawal Earthquake : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भुसावळसह (Bhusawal) सावदा परिसरात आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला.

Bhusawal Earthquake : जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातील भुसावळ शहर आणि परिसरात शुक्रवारी सकाळी दहा वाजून 37 मिनिटांनी भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने नागरीकांमध्ये एकच गोंधळ उडाला. भुसावळसह लगतच्या सावदा, कंडारी रायपुर भागातही दहा ते वीस सेकंद हे धक्के जाणवल्याने समजते आहे. 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळसह (Bhusawal) सावदा परिसरात आज सकाळी दहा वाजून 37 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रावळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा (Earthquake) धक्का जाणवला आहे. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती जिल्हा माहिती केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. भुसावळ शहरातील (Bhusawal City) नागरिकांनी सकाळी घरांना हादरे बसले, शिवाय काहीतरी वस्तू मोठ्याने पडल्यावर जसा आवाज येतो, तसा आवाज झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले तर काही इमारतींमधून नागरिक तात्काळ बाहेर पडल्याचे सांगितले जाते. 

जळगाव जिल्ह्यात भुसावळसह सावदा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रिश्टर स्केल वर 3.3 इतक्या तीव्रतेचा हा भूकंप झाल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे. शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहा वाजून 37 मिनिटांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळसह सावदा परिसरात हे धक्के झाल्याची नोंद नाशिक (Nashik) येथील मेरी संस्थेत झाल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र नाशिकच्या मेरी येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी ही नोंद मुंबई केंद्रात होत असल्याचे सांगितले. 

दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवित आणि वित्तहानी झालेली नाही, मात्र भूकंप पुन्हा जाणवल्यास त्यापासून बचाव करण्याच्या ज्या सूचना शासकीय पातळीवर देण्यात आल्या आहे. तसेच भूकंपाचा धक्का बसल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चाना उधाण आले होते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, धक्का जाणवताच लगेच घराच्या बाहेर पडावे, प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करण्यात यावे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली आहे. शहरातील गडकरीनगर ग्रीन पार्क, विठ्ठलमंदिर वार्ड, शनि मंदिर वार्ड, वांजोळा रोड, बाजारपेठ परिसरातदेखील दीड सेकंदाचे भुकंपाचे धक्‍के बसल्‍याची माहिती नागरिकांनी दिली आहे. आज सकाळी अचानक घर हलल्यासारखे, भांडे पडल्याचा अनुभव काही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Rane Nagpur Session : आक्रमक निलेश राणेंना Devendra Fadnavis यांनी एका मिनिटात शांत केलंNana Patole Nagpur : एक देश, एक निवडणूक वरून नाना पटोलेंची टीकाNitin Raut on Chhagan Bhujbal : भुजबळ आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागत - नितीन राऊतPune Winter Cold : गुलाबी थंडीने पुणे गारठलं; 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली; अजित पवार-प्रफुल पटेलांना खडे बोल सुनावले, म्हणाले....
मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का? प्रफुल पटेलांनी अजित पवार-प्रफुल पटेलांना सुनावलं
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
Embed widget