एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Nashik news : पंधरा दिवसांत नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा, पालकमंत्री दादा भुसे यांचा मनपाला अल्टिमेटम 

Nashik News : येत्या पंधरा दिवसात नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा अल्टिमेटम पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेला दिला.

Nashik Potholes : नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा (Nashik Potholes) प्रश्न गंभीर बनल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत खड्ड्यांची पाहणी केली. त्याचबरोबर पाहणीत अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेची कान उघडणी केली. येत्या पंधरा दिवसांत शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा अल्टिमेटम पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी महापालिकेला दिला.

नाशिक (Nashik) शहरात पावसाची संततधार नसली तरी यंदाही अनेक भागात रस्ते खड्डेमय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे वाहनधारकांची कसरत होत असून या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी शहरात फेरफटका मारत खड्ड्यांची पाहणी केली. हलक्या पावसामुळे (Nashik rain) शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककर हैराण झाले आहेत. दादा भुसे यांनी विविध रस्त्यांची पाहणी करत प्रशासनाला सूचना केल्या. शहरातील ज्या रस्त्यांचे डांबरीकरण गेल्या तीन वर्षात झाले, अशा लायबीलिटी पिरियडमधील रस्त्यांची डागडुजी करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. तसेच रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्यास जबाबदारी निश्चित करून संबंधितावर आयुक्तांनी कारवाई करावी, शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे येत्या पंधरा दिवसात बुजवून नाशिक खड्डे मुक्त करावे, असा अल्टिमेटम भुसे यांनी यावेळी मनपा अधिकाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान दोन महिने उलटूनही नाशिक शहरात (Nashik Rain Update) पावसाचा पत्ता नाही. कशी ऊन तर कधी ढगाळ वातावरण तर कधी हलक्या सरी कोसळत आहे. त्यामानाने मागील वर्षी शहरात तुफान पाऊस बरसत होता. त्यामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत होते. यंदा तर फारसा पाऊस नसूनही अनेक भागात खड्डे पडले आहेत. त्यातच मनपा प्रशासनाने बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रिट करण्याचा निर्णय घेतला असून अनेक भागात कामही सुरु करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री दादा भुसे यांनी रस्त्यावर उतरत पाहणी केली. यात अनेक भागातील रस्ते खड्डेमय झाले असून नाशिककरांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले. म्हणूनच त्यांनी मनपा प्रशासनाला आगामी पंधरा दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे अल्टिमेटमदिला आहे. 

नाशिकचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार 

नाशिक शहारत सध्या 2300 किलोमीटरचे रस्ते आहेत त्यातील 300 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून टप्या टप्याने सिमेंट काँक्रेटचे रस्ते केले जाणार असून त्यासाठी मनपाच्या बजेटमध्येही तरतूद केली जाणार आहे. काही ठिकाणी काँक्रीटचे रस्ते बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र त्याची गती अत्यंत संथ आहे. एक एक वर्ष उलटून जाते तरीही रस्ते होत नसल्यानं परिसरातील नागरिकांना, वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एकीकडे संथ गतीच्या कामाने होणारा त्रास आणि दुसरीकडे खड्ड्यातून कसरत करत मार्ग काढताना होणारा मनस्ताप असा अशा दुहेरी कात्रीत नाशिककर अडकले असल्यानं आधी खड्डे बुजवून नाशिकराचे हाल कमी करा, अशी मागणी होत आहे.

ईतर संबंधित बातम्या : 

Nashik News : 'नवे रस्ते करायचे तेव्हा करा, मात्र आता खड्ड्याच्या त्रासातून मुक्त करा, नाशिककर संतापले! 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget