एक्स्प्लोर

Maharashtra Nashik News : नाशिक महापालिका अतिक्रमण पथकावर दगडफेक, अनधिकृत झोपड्या हटवताना नागरिक संतप्त

Maharashtra Nashik News : नाशिक महापालिका (Nashik NMC) अतिक्रमण पथकावर संतप्त नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली आहे.

Maharashtra Nashik News  : नाशिक महापालिका (Nashik NMC) अतिक्रमण पथकावर संतप्त नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू असताना हा सगळा प्रकार घडला आहे. त्यानंतर पोलिसांकडून (Nashik Police) या नागरिकांची धरपकड करण्यात आली असून या प्रकारानंतर दंगल नियंत्रण पथकाच्या बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाई आली. या मोहिमेत जवळपास पंधरा अधिक झोपड्या हटविण्यात आल्या आहेत.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक महापालिकेच्या (Nashik Mahapalika) वतीने शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण मोहीम (Encroachment Campaign) राबवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पंचवटी विभागातील गंगा गोदावरी गौरी पटांगण येथील झोपडपट्टी काढण्याचे काम सुरू असताना अतिक्रमण पथकावर दगडफेक केल्याची घटना घडली होती. यावेळी पथकातील अनेक कर्मचारी जखमी झाल्याचे समोर आले होते. पंचवटीतीलच पेठरोड भागात अतिक्रमण पथकावर स्थानिक नागरिकांकडून अतिक्रमण विभाग कार्यवाही करताना दगडफेक करण्यात आली आहे.

नाशिक (Maharashtra Nashik News) शहरातील पेठरोड परिसरातील मार्गावर अनेक झोपड्या वसलेल्या आहेत. यात झोपड्या हटवण्याचे काम आज सकाळपासून नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC News) अतिक्रमण विभागाकडून करण्यात येत आहे. याचदरम्यान काही वेळापूर्वी स्थानिक नागरिकांकडून पथकावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. अतिक्रमण पथकातील जेसीबीवर देखील दगडफेक करण्यात आल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर दंगल नियंत्रण पथक देखील घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर काही नागरिकांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे. आता पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर तणाव देखील निवळला आहे. 

आज सकाळपासून सुरु असलेल्या कारवाईत जवळपास पंधराहून अधिक झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. आज सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. आज सकाळपासून महापालिका अतिक्रमण विभागाकडून करण्यात आली. पोलीस नियंत्रण पथकाने काही नागरिकांना ताब्यात देखील घेण्यात आलेला असून पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई सुरू आहे. 

Maharashtra Nashik News : मनपाकडून नागरिकांना इशारा 

नाशिक मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या  उपायुक्त करुणा डहाळे यांनी सांगितले की, पंचवटी परिसरातील 20 झोपड्या हटविण्यात आल्या असून या रहिवाशांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना विभागीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती. त्यानुसार आज सकाळपासून ही कारवाई सुरळीत सुरू होती. काही वेळापूर्वी काही मुलांनी गोंधळ घालून दगडफेक केली. यात कुणीही जखमी नाही. मात्र जेसीबीचे मोठे नुकसान झाले. नुकसान करणाऱ्या युवकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापुढे अशाप्रकारे कुणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, तर गुन्हा दाखल केला जाईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget