एक्स्प्लोर

Advay Hire is out of jail : विधानसभेच्या तोंडावर नाशकात ठाकरे गटाला मोठा दिलासा; मंत्री दादा भूसेंविरोधात भिडू ठरला?

Advay Hire Malegaon Outer Assembly constituency : नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात हिरे यांच्या कुटुंबाचा दबदबा कायम राहिलेला आहे. हिरे यांनी 27 जानेवारी 2023 मध्ये शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला होता.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) पक्षाचे उपनेते अद्वय हिरे Shiv Sena deputy leader Advay Hire यांना अखेर मुंबई हायकोर्टानं (Bombay High Court) जामीन मंजूर केल्यानंतर आज (14 ऑगस्ट) मध्यवर्ती कारागृहातून सूटका होणार आहे. ऐन निवडणुकीच्या (Maharashtra Election) तोंडावर अद्वय हिरे यांना जामीन मिळाल्याने शिवसेना ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मालेगावमधील रेणूका देवी सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी अद्वय हिरे यांना अटक करण्यात आली होती.  नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज थकवल्याप्रकरणी मालेगावातील रमजानपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्वय हिरे यांना 15 नोव्हेंबर 2023 रोजी अटक करण्यात आली होती. पहिल्यांदा पोलिस कोठडीनंतर 23 नोव्हेंबर 2023 पासून हिरे न्यायालयीन कोठडीत होते. 

अद्वय हिरे आणि दादा भुसे यांच्यांत सामना रंगणार?

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांनी दादा भुसे यांना शह देण्यासाठी अद्वय हिरे यांना उपनेतेपदी संधी दिली. आता अद्वय हिरे यांची जामीनावर सूटका झाल्याने ते मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असू शकतात. त्यामुळे अद्वय हिरे आणि दादा भुसे यांच्यांत विधानसभेचा सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात हिरे यांच्या कुटुंबाचा दबदबा कायम राहिलेला आहे. अद्वय हिरे यांनी 27 जानेवारी 2023 मध्ये शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. दादा भुसे यांच्या विरोधात ठाकरेंकडून अद्वय हिरे यांना बळ दिलं जाण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोडSpecial Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?Zero Hour Guest Centre | ठाकरेंचे खासदार फुटणार? Sanjay Jadhav आणि  Naresh Mhaske गेस्ट सेंटरवरZero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Pune | महापालिकेच्या महावसुलीत होतोय दुजाभाव?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
Embed widget