एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

धक्कादायक! नाशिकमध्ये अवघ्या 16 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nashik News : लहवित येथील एका अवघ्या सोळा वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Nashik News : नाशिक येथे धक्कादायक घटना घडली आहे. लहवित (Lahvit) येथील एका अवघ्या सोळा वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला आहे. तेजस विठ्ठल आहेर (Tejas Vitthal Aher) असे या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस आहेर हा आपल्या कुटूंबीयांसोबत खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडला. त्यामुळे त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. 

तीन दिवसांपासून तेजसला जाणवत होता त्रास

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्याच्या छातीत आणि पोटात जळजळ होत होती. यामुळे त्याला त्याच्या कुटुंबियांना रुगणालयात उपचारासाठी नेले होते. दोन दिवस औषधोपचार केल्यानंतर त्याची तब्येत काहीशी सुधारली होती. मात्र  त्यांनतर तेजस आपल्या कुटुंबियांसोबत टीव्ही पाहत खेळत मग्न असताना त्याला अचानक पोटात त्रास जाणवू लागला होता. 

शोकाकूल वातावरणात तेजसवर अंत्यसंस्कार

कुटुंबियांना याबाबत माहिती मिळण्याच्या आधीच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला उपचारासाठी देवळाली (Deolali) येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याआधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शोकाकूल वातावरणात तेजसवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, चुलते असा परिवार आहे. तेजसच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.  तेजस आहेर हा शाळकरी विद्यार्थी होता. त्याची दैनंदिन कामे देखील सुरू होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढत आहे. तणाव, हवामानातील बदल, खाण्या-पिण्याच्या पद्धती बदलती जीवनशैली यामुळे हा धोका वाढत असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Marathi Actor : 'भाई'चं शुटींग सुरु असताना हार्टअटॅक आला अन्... , अभिनेत्याने आयुष्यातल्या 'त्या' प्रसंगाचा केला खुलासा; म्हणाला 'मला अक्षरश:'

हाताला वेदना, बोटाला सूज; लक्षणं साधी, पण संकेत मोठे, हार्ट अटॅकचा धोका, काय कराल?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Embed widget