Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! दारू पिताना मित्रांमध्ये उफाळला वाद, दगडानं ठेचून 28 वर्षीय युवकाला संपवलं
Nashik Crime News : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडाने ठेचून एका 28 वर्षीय युवकाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
![Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! दारू पिताना मित्रांमध्ये उफाळला वाद, दगडानं ठेचून 28 वर्षीय युवकाला संपवलं Nashik Crime argument between friends over drinking Death of young man due to beating Maharashtra Marathi News Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! दारू पिताना मित्रांमध्ये उफाळला वाद, दगडानं ठेचून 28 वर्षीय युवकाला संपवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/179ecb1184f3c7eb4981874bbe9a0fc61718518074583923_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Crime News नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये (Nashik) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता म्हसरुळ पोलीस ठाणे (Mhasrul Police Station) हद्दीत असेलल्या मेरी रासबिहारी लिंकरोडवर (Meri-Rasbihari Link Road) औदुंबर लॉन्सच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर रिक्षा चालक युवकाची हत्या करण्यात आली आहे. प्रशांत तोडकर (28, रा. रामवाडी) असे या मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत हा नाशिकच्या सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. रात्रीच्या वेळी प्रशांत आणि इतर मित्रांसोबत झालेल्या वादात प्रशांच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. नेमकी ही हत्या कोणी केली या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. रात्री उशिरा ही घटना घडल्यानंतर सकाळी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या अवघ्या दोन मिनिटाच्या अंतरावर एकाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मारेकऱ्यांच्या मागावर पोलीस पथके रवाना
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे तपास पथक आणि डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात पोलिसांचा तपास सुरू आहे. नेमकी ही घटना कशी झाली आणि खून नेमका कोणी केला या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्यांच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पोत्यात आढळल्या मानवी कवट्या
पंचवटीमध्ये एका पोत्यात मानवी कवट्या आणि हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली. एरंडवाडीमध्ये मंदिर परिसरात भरवस्तीत पोत्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हाडे आणि कवट्या मिळाल्यानंतर चांगलीच चर्चा रंगली होती. मानवी हाडे आणि कवट्या असलेली पोतं मिळाल्याची बातमी समजल्यानंतर पंचवटी पोलिस त्या ठिकाणी तातडीने पोहोचले. पोलिसांनी मानवी हाडे आणि कवट्या असलेलं पोतं ताब्यात घेतलं. पंचवटी पोलिसांनी याचा सखोल तपास करत ही मानवी हाडे आणि कवट्या प्लास्टिकच्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! रेल्वेत नोकरीला लावून देण्याचे दाखवले आमिष, 62 जणांकडून तब्बल 6 कोटी उकळले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)