महाआरक्षणाचं महायज्ञ करतोय, मी जिवंत असेपर्यंत आरक्षणाला धक्का लावू देणार नाही; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
PM Narendra Modi : कर्नाटक मॉडेल पूर्ण देशात लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. मोदी जोवर जिवंत आहे तोवर आरक्षण कोणी घेऊ शकत नाही, अशी टीका पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली.
PM Narendra Modi : कर्नाटक मॉडेल पूर्ण देशात लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून (Congress) केला जात आहे. तुमचा हक्क लुटण्याचा प्रयत्न आहे. मात्र आपल्याकडे मोदींचा भरोसा, मोदींची गॅरंटी आहे. मोदी जोवर जिवंत आहे तोवर एसटी, एससी, ओबीसी आरक्षण कोणी घेऊ शकत नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज महायुतीच्या उमेदवार हिना गावित (Hina Gavit) यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कर्नाटकात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी प्रयन्त केले जात आहेत. कर्नाटकात मुस्लिमांना एकाच रात्रीत ओबीसींचे आरक्षण दिले. कर्नाटक मॉडेल पूर्ण देशात लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. महाआरक्षणाचा महायज्ञ करणार आहे.
काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला सन्मान दिला नाही
काँग्रेसने गरिबांकडे कधीच लक्ष दिले नाही. आदिवासींचे आरक्षण काढून काँग्रेसने मुस्लिमांना दिले. आरक्षणाचा फायदा काँग्रेस मुस्लिमांना करून देत आहे. काँग्रेसने लिहून द्यावे मुसलमानांना आरक्षण देणार नाही. पण ते लिहून देत नाहीत, तुमचा हक्क लुटण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या यंत्रणांकडून अफवा पसरवण्याचे काम सुरु आहे. काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला सन्मान दिला नाही.
आपल्याकडे मोदींचा भरोसा, मोदींची गॅरंटी
मी काँग्रेसप्रमाणे मोठ्या परिवारातून आलेलो नाही. मात्र आपल्याकडे मोदींचा भरोसा, मोदींची गॅरंटी आहे. मोदी जोवर जिवंत आहे तोवर एसटी,एससी, ओबीसी आरक्षण कोणी घेऊ शकत नाही. विकास कामांमध्ये काँग्रेस आमचा सामना करू शकत नाही. वंचित वर्गाच्या अधिकारांचा मी चौकीदार आहे. भाजपला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? पंतप्रधान मोदीविरोधात प्रक्षोभक वक्तव्य; भाजपकडून पोलिसांत तक्रार दाखल