एक्स्प्लोर

Neelam Gorhe : 'मविआचं सरकार गडगडायला नाना पटोले कारणीभूत'; नीलम गोऱ्हे यांचा खळबळजनक दावा

Neelam Gorhe on Nana Patole : आमची महाविकास आघाडीची सत्ता नाना पटोले यांच्यामुळेच गेली. आमचे सरकार गडगडायला नाना पटोले कारणीभूत आहेत, असा खळबळजनक दावा नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.

नंदुरबार : आमची महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता नाना पटोले यांच्यामुळेच गेली. आमचे सरकार गडगडायला नाना पटोले (Nana Patole) कारणीभूत आहेत, असा खळबळजनक दावा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नंदुरबार (Nandurbar) येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी चारशे कोटीहून अधिक निधीची उधळपट्टी करण्यात आली. लोकांनी सांगितलं तुमचे दीड हजार नको आमच्या मुली सुरक्षित हव्या आहेत. महाराष्ट्रातील सरकार असंविधानिक आहे, असे त्यांनी म्हटले होते. यावरून नीलम गोऱ्हे यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. 

आमचे सरकार गडगडायला नाना पटोले कारणीभूत

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आमची महाविकास आघाडीची सत्ता नाना पटोले यांच्यामुळेच गेली. आमचे सरकार गडगडायला नाना पटोले कारणीभूत आहेत. नाना पटोले हे विनोदाचा भाग आहे.  त्यांच्या शब्दाला विनोदा पलिकडे काही अर्थ नाही, अशी टीका त्यांनी नाना पटोले यांच्यावर केली आहे. महिलांना मिळणाऱ्या योजनेमुळे महिला आनंदित झाल्या आहेत. मात्र, नाना पटोले यांना ते बघवत नाही का? असा सवालही नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे. 

महिला सुरक्षेची योजना मुख्यमंत्री आणणार

भंडारा येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीची छेडछाड करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याबाबत विचारले असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना अतिशय गंभीर आहे. यासाठी महिलांना शस्त्र दिले पाहिजे. घडलेली घटना वाईट आहे मात्र महिला धाडसीने पुढे येऊन गुन्हा नोंदवताय हे महत्त्वाचं आहे. महिला सुरक्षेची योजना मुख्यमंत्री आणणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

कोर्ट त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल

शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. म्हात्रे यांच्या विरोधात विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विचारले असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कुठल्याही क्षेत्रात महिला असुरक्षित आहेत. वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कोर्ट त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल आणि कोण खरं, कोण खोटं हे सिद्ध होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

आणखी वाचा

Nana Patole : बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव, CCTV फुटेज गायब; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही
मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे
Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोरCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 13 September 2024 :  ABP MajhaABP Majha Headlines : 11.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सCongress Manifesto for Maharashtra Assembly Election: मायक्रो प्लॅनिंग! काँग्रेस तीन जाहीरनामे देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही
मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे
Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Laser Lights Banned in Kolhapur : दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
Bigg Boss Marathi Aarya Jadhao : जेल की घराबाहेर गच्छंती? निक्कीला मारहाण केल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार?
जेल की घराबाहेर गच्छंती? निक्कीला मारहाण केल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार?
Embed widget