एक्स्प्लोर

Nandurbar News : घराच्या अंगणात जेवण करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला, फटफटत जंगलात नेलं

Nandurbar News : नंदुरबारमध्ये घराच्या अंगात जेवण करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यानंतर तिला फरफटत नेऊन ठार केलं. अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा इथे ही हृदयद्रावक घटना घडली.

Nandurbar News : बिबट्यांचा (Leopard) मानवी वस्तीमधील वावर वाढला आहे. इतकंच नाहीतर बिबट्यांच्या हल्ल्याच्या (Leopard Attack) घटनांमध्येही वाढ झाली आहे. नंदुरबारमध्ये (Nandurbar) घराच्या अंगात जेवण करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यानंतर तिला फरफटत नेऊन ठार केलं. मोगराबाई रुमा तडवी असं या महिलेचं नाव आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा इथे ही हृदयद्रावक घटना घडली.

या घटनेमुळे परिसरात भीतीयुक्त वातावरण पसरलं आहे. वन विभागाने या परिसरात असणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. 

नेमकं काय घडलं?
मोगराबाई रुमा तडवी (वय 55 वर्षे) या रात्री नऊच्या सुमारास मालीआंबा इथे आपल्या राहत्या घराच्या अंगणात जेवण करत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवून फरफटत नेलं. यावेळी घरात कोणीच नसल्याने असहाय्य झालेल्या मोगराबाई तडवी यांना बिबट्याने घरापासून सुमारे वीस ते पंचवीस मीटर अंतरावर नेऊन त्यांचं शरीर छिन्नविच्छिन्न केलं. 

सकाळी बिबट्या मृतदेहाचे लचके तोडताना दिसला
यानंतर रात्री मोगराबाई तडवी यांचे पती आणि मुलगा घरी आले. मोगरबाई घरात न दिसल्याने त्यांनी आवाज दिला. जंगल परिसर असल्यामुळे घराशेजारी अंधार होता. त्या अंधारात त्यांनी मोगराबाई यांचा शोध घेतला परंतु त्या दिसल्या नाहीत. मग रात्री तीनच्या सुमारास पुन्हा एकदा मोगराबाई यांना आवाज दिला आणि शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देखील त्या दिसल्या नाहीत. मग सकाळी सहाच्या सुमारास उजाडल्यानंतर दोघांनीही त्यांचा पुन्हा शोध घेतला. त्यावेळी घरापासून 20 ते 25 मीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर बिबट्या मोगराबाई यांचा मृतदेहाचे लचके तोडत होता, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली.

हिंस्त्र प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी
या घटनेची माहिती डाबचा मालीआंबा गावाच्या सरपंचांना देण्यात आली. तसंच वन विभाग आणि पोलिसांनाही कळवण्यात आलं. माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणाची पाहणी करुन पंचनामा करण्यात आला. दरम्यान, मृत मोगराबाई तडवी यांच्या घराजवळच्या परिसरात जंगल आहे. त्यामुळे या परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. वनविभागाने या हिंस्त्र प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणीही परिसरातील नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Happy Birthday Raveena : तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर; एकासोबत साखरपुडा पण प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्री रवीनाचं टोकाचं पाऊल, डिप्रेशनचाही शिकार
तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर, एकासोबत साखरपुडा; प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Shadashtak Yog : दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha File Nomination : अर्ज किया है...देवदर्शन, औक्षण आणि शक्तिप्रदर्शनSpecial Report Worli Vidhan Sabha  : वरळीत हायव्होल्टेज, आदित्य ठाकरे सर्वांना पुरुन उरणार?Special Report Sunil kedar Ramtek Vidhansabha : रामटेकसाठी सुनील केदारांच्या मातोश्री बंगल्याच्या वाऱ्याZero hour : चंद्रपुरात वॉर ए जोरगेवार, सुधीर मुनगंटीवारांकडून टोकाचा विरोध, पुढे काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Happy Birthday Raveena : तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर; एकासोबत साखरपुडा पण प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्री रवीनाचं टोकाचं पाऊल, डिप्रेशनचाही शिकार
तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर, एकासोबत साखरपुडा; प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Shadashtak Yog : दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
Embed widget