नंदुरबार जिल्ह्यातील पपई पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव, रोगामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला
पपईवर पडलेल्या या रोगामुळे आता पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गेल्यानं बळीराजासमोर आव्हानांचा डोंगर उभा ठाकलाय.
नंदुरबार : देशातील सर्वात मोठा पपई (Papaya) उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची (Nandurbar News) ओळख आहे.नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जात असते यावर्षी असलेल्या दुष्काळी परिस्थितीतही पपई उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पपई बागा जगवल्या होत्या मात्र पावसानं दिलेली हुलकावणी,त्यानंतर अतिवृष्टी सारखा झालेला पाऊस. यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. पपईवर पडलेल्या या रोगामुळे आता पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास गेल्यानं बळीराजासमोर आव्हानांचा डोंगर उभा ठाकलाय.
जिल्ह्यात जवळपास दहा हजार एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर पपईचे लागवड केली जात असते यातील सर्वाधिक क्षेत्र शहादा तालुक्यातील असून शहादा तालुक्यात जवळपास 4000 हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जात असते. मात्र यावर्षी शहादा तालुक्यात पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे असून पपईचे उत्पादन येईल का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कमी झालेला पाऊस आणि त्यानंतर अतिवृष्टी सारखा झालेला पाऊस आता त्यातच भर म्हणून पपईवर आलेला विषाणूजन्य रोग यातून उत्पादन खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मोझ्याक व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव
पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांमुळे पपईच्या झाडावरील पानाची गळती लवकर होते. शेंड्याकडील पाने आकसतात त्यामुळे फळे उघडे पडून उन्हामुळे खराब होतात अशा फळांना व्यापारी ही खरेदी करत नसतात जिल्ह्यात जवळपास 3000 हेक्टर पेक्षा अधिक पपईवर या मोझ्याक व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी पपई भागांवरील संकट दूर होताना दिसत नाही त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केले आहे.
पपई हब म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख
देशातील सर्वात मोठा पपई हब म्हणून नंदुरबार जिल्ह्याकडे पाहिले जात असते. दरवर्षी पपई पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो मात्र पपईवर संशोधन करण्यासाठी पपई संशोधन केंद्र राज्यात कुठे नसल्याने पपई उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात त्यामुळे नंदुरबार येथे केंद्र आणि राज्य सरकारने पपई संशोधन केंद्र सुरू करून पपईवर येणाऱ्या विविध रोगांवर संशोधन होणे गरजेचे आहे.
हे ही वाचा :