एक्स्प्लोर

Nanded Lok Sabha : मोठी बातमी : नवनीत राणा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात? नांदेड पोटनिवडणुकीत होणार पुनर्वसन? नेमंक काय घडतंय?

Navneet Rana : काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. आता नवनीत राणा भाजपकडून नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

अमरावती : नांदेडची पोटनिवडणूक घोषित झाल्यानंतर काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात सुरुवातीला राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती समोर आली होती. मात्र अशोक चव्हाण यांनी मी ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे म्हटले. यानंतर आता भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) या नांदेड लोकसभा (Nanded Lok Sabha) पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबत (Maharashtra Assembly Elections 2024) नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची देखील घोषणा केली. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेडची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानादिवशीच म्हणजे 20 नोव्हेंबरलाच या लोकसभेसाठी मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल असणार आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत? 

काँग्रेसने या जागेवर वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नांदेडमधून पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. आता भाजप नेत्या नवनीत राणा यांचे नाव या निवडणुकीसाठी समोर येत आहे. त्यामुळे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी द्यावी

भाजप नेत्या नवनीत कौर या अमरावती लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला. आता नवनीत राणा यांना भाजपकडूनच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत पुन्हा उमेदवारी द्यावी मागणी करण्यात आली आहे. कारण नवनीत कौर राणा यांचे वडील मूळचे पंजाबचे आहेत. नांदेड येथे शीख समाजाचं मोठं तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो, असं भाजपच्या एका गटाने सांगितल्याची माहिती मिळत आहे. आता यावर भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा फाॅर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार!
महायुतीचा फाॅर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार!
BJP Candidate List: ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरे; कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी
ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरे; कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी
भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार? 
भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार? 
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सख्ख्या भावांना तिकीट, तीन अपक्षांना उमेदवारी; नेत्यांची मुलंही मैदानात, भाजपच्या पहिल्या यादीची 5 वैशिष्ट्ये!
सख्ख्या भावांना तिकीट, तीन अपक्षांना उमेदवारी; नेत्यांची मुलंही मैदानात, भाजपच्या पहिल्या यादीची 5 वैशिष्ट्ये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Full Speech : लढणार! जरांगेंची मोठी घोषणा, राजकारण हादरवणारं भाषणBJP Vidhan Sabha Candidate List : Atul Bhatkhalkar यांना भाजपमधून पुन्हा संधी, प्रतिक्रिया काय?Shreejaya Chavan On Vidhan Sabha :भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी, पहिली प्रतिक्रिया काय?Chandrashekhar Bawankule On Vidhan Sabha : बावनकुळे यांना संधी; नागपूर मध्यची जागा कुणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा फाॅर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार!
महायुतीचा फाॅर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार!
BJP Candidate List: ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरे; कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी
ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरे; कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी
भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार? 
भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार? 
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सख्ख्या भावांना तिकीट, तीन अपक्षांना उमेदवारी; नेत्यांची मुलंही मैदानात, भाजपच्या पहिल्या यादीची 5 वैशिष्ट्ये!
सख्ख्या भावांना तिकीट, तीन अपक्षांना उमेदवारी; नेत्यांची मुलंही मैदानात, भाजपच्या पहिल्या यादीची 5 वैशिष्ट्ये!
BJP candidate list Mumbai: भाजपची विधानसभेची उमेदवारी यादी जाहीर, राम कदमांना 'अयोध्या नरेश' पावला, तमिल सेल्वन यांना पुन्हा संधी
भाजपची विधानसभेची उमेदवारी यादी जाहीर, राम कदमांना 'अयोध्या नरेश' पावला, तमिल सेल्वन यांना पुन्हा संधी
Sangli District Assembly Constituency : महिन्याभरापूर्वी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय, मात्र महिन्यानंतर भाजपकडून थेट उमेदवारीची घोषणा
महिन्याभरापूर्वी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय, मात्र महिन्यानंतर भाजपकडून थेट उमेदवारीची घोषणा!
BJP Candidate List : महाजन ते ढिकले, विखे ते हिरे...; भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी?
महाजन ते ढिकले, विखे ते हिरे...; भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी?
BJP Candidate List : शिवाजीनगर, पर्वती, भोसरीमधून विद्यमान आमदारांना पुन्हा लॉटरी; कोथरूड अन् चिंचवड मध्ये कोणाला तिकीट?
शिवाजीनगर, पर्वती, भोसरीमधून विद्यमान आमदारांना पुन्हा लॉटरी; कोथरूड अन् चिंचवड मध्ये कोणाला तिकीट?
Embed widget