एक्स्प्लोर

नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या

या तिघींचा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावकऱ्यांची मोठी गर्दी होती.

Nanded: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. पुणे, मुंबईसह मराठवाडयात ठिकठिकाणी पाणीच पाणी साठल्याचं पहायला मिळालं. नांदेडमधील हतगावमध्ये ओढयाला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या माय-लेकीसह पुतणी अशा तिघींचा मृतदेह आढळून आलाय. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वरवट गावातील ही घटना आहे.

शेतात कामासाठी गेलेल्या अरुणा शिकरगे या महिलेने आपल्या सोबत मुलगी दुर्गा आणि पुतणी अंकिताला सोबत नेले होते. दुपारच्या वेळी मुसळधार पाऊस आल्याने अरुणा दोन्ही मुलीला घेऊन घराकडे निघाली होती. यावेळी गावाजवळच्या ओढ्याला आलेल्या पुरात मुलगी दुर्गा वाहून जात होती. मुलीला वाचवण्यासाठी आईने धाव घेतली, यात तिघीही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. या तिघींचा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावकऱ्यांची मोठी गर्दी होती.

ओढ्याला अचानक पूर आला, तिघींचा मृत्यू

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने अनेक भागांत भीषण नुकसान केलं असून, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वरवट गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ओढ्याला आलेल्या अचानक पुरात वाहून गेलेल्या माय-लेकीसह पुतणीचा मृतदेह सापडल्याने गावात खळबळ उडाली. अरुणा शिवाजी शिकरगे,तिची मुलगी दुर्गा आणि पुतणी अंकिता अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अरुणा शिकरगे या शेतात कामासाठी आपल्या मुलगी दुर्गा आणि पुतणी अंकितासह गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस वाढल्याने तिघीही घराकडे यायला निघाल्या. मात्र गावाजवळील ओढ्याला अचानक पूर आल्याने, त्यांना घराकडे परतताना अडथळा निर्माण झाला. ओढा पार करत असताना दुर्गा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली. तिला वाचवण्यासाठी आई अरुणा धावली, आणि तिच्या मागोमाग अंकिताही पुढे गेली. मात्र पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, तिघीही त्यात वाहून गेल्या.

गावकऱ्यांनी तात्काळ शोधमोहीम राबवली. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरु केलं. काही तासांच्या शोधानंतर तीनही मृतदेह सापडले. एका कुटुंबातील तिघांचा असा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी दुर्घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा:

पुण्यात भिंत ढासळून तब्बल 18,000 कोंबडयांचा मृत्यू, पावसाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये लाखोंचं नुकसान

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget