एक्स्प्लोर

Nanded News : हातभट्टी चालवणाऱ्या हाताला मिळणार आता रोजगार; नांदेड जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

Nanded News : कारवाईसोबतच या गुन्ह्यातील लोकांना रोजगाराचे नवीन मार्ग मिळावेत यासाठी त्यांच्या पात्रतेप्रमाणे शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या जात आहे.

Nanded News : नांदेड (Nanded) जिल्हा हातभट्टी आणि ताडी मुक्त होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जोरदार कारवाई करत मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र आता कारवाईसोबतच या गुन्ह्यातील लोकांना रोजगाराचे नवे मार्ग मिळावेत यासाठी त्यांच्या पात्रतेप्रमाणे शासकीय योजना पोहचवता याव्यात यादृष्टीने जिल्हा परिषद, महसूल विभाग आणि शासनाच्या इतर विभागाच्या वतीने एकत्रित प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मजबुरीने गुन्हेगारी क्षेत्रात आलेल्या अनेकांना रोजगार मिळत असून, या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. 

नांदेड जिल्हा हातभट्टी आणि ताडी मुक्त होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक व्यापक मोहिम हाती घेतली आहे. आजवर राबविल्या जाणाऱ्या मोहिमेचे अनुभव लक्षात घेऊन याला अधिक सकारात्मक आणि परिणामकारक करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ज्या हद्दीत हातभट्टी आहे ती संबंधित ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि पोलीस विभागासमवेत ही मोहिम राबविली जात आहे. एकाच वेळी धाड टाकून हातभट्टी, ताडी मुक्तीला आळा बसत नसल्याने सलग महिनाभर दररोज समुपदेशनासह कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. या दुहेरी कार्यपद्धतीमुळे आता हातभट्टी चालक रोजगाराच्या नव्या संधीसाठी तयार झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील हातभट्टीसाठी आव्हानात्मक ठरलेल्या मुदखेड तालुका आणि विशेषत: मौजे चिकाळा तांडा यासाठी प्रातिनिधीक ठरला असून लवकरच इतर तांडे आणि ठिकाणे नव्या बदलासाठी तयार होतील, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपआयुक्त उषा शर्मा यांनी व्यक्त केला.

तांड्यातील लोकांशी सुसंवाद घडवून आणले जात आहे... 

हातभट्टी आणि ताडीमुक्तीचे हे अभियान 10 मे पासून आजतागायत सलग सुरू आहे. मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा हा यासाठी आव्हानात्मक असल्याने यावर लक्ष देण्यात आले. आतापर्यंत 81 गुन्हे दाखल करून 4 लाख 75 हजार 660 रुपयाचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे. याचबरोबर या संपूर्ण परिसरातील सराईत गुन्हेगार शोधून त्यांच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. हातभट्टीसाठी जे व्यापारी काळा गुळ पुरवतात त्या व्यापारी आणि इसमांना शोधून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

तर गटविकास अधिकारी, तहसिलदार, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, इतर समुपदेशकांना बोलावून त्यांचा चिकाळा तांड्यातील लोकांशी सुसंवाद घडवून आणल्या जात असल्याची माहिती उपायुक्त उषा शर्मा यांनी दिली. जिल्ह्यात ज्या ठिकाणी हातभट्टी, गावठी दारू, ताडी, सिंधी निर्मिती विक्रीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क दक्ष आहे. नागरीकही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. ज्या गावात हातभट्टी अथवा ताडी व्यवसाय चालू असेल त्याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 1800 233 9999 या टोलफ्री क्रमांकावर कळवावी, असे आवाहन अधिक्षक अ. अ. कानडे यांनी केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nanded News : महाविद्यालयीन विद्यार्थिनीने सततच्या छेडछाडीला कंटाळून केली आत्महत्या; नांदेड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget